आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘जातपंचायतच बरखास्त करा’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून पित्याने आपल्या गरोदर मुलीचा खून केल्याच्या तसेच जातपंचायतीच्या न्यायालयाच्या विरोधात जाऊन आंतरजातीय विवाह केलेल्या सामान्य कुटुंबांना बहिष्कृत केल्याच्या निषेधार्थ मिश्र विवाह चळवळीच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला.

जातपंचायत बरखास्त करा, जातपंचायतचा निषेध असो, असे म्हणत महिला व युवकांनी या मोर्चात उस्फूर्तपणे सहभाग नोंदवला. बहिष्कृत केलेल्या कुटुंबीयांच्या नातेवाइकांचे प्रतिनिधीही लासलगावहून मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चाच्या माध्यमातून निवेदनाद्वारे मागण्या करण्यात आल्या. निवेदनात जातपंचायतीच्या बहिष्काराला बळी पडलेल्यांना न्याय देण्यात यावा, जातपंचायतच बरखास्त करण्यात यावी, आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन मिळण्यासाठी शासनस्तरावर देण्यात येणार्‍या 50 हजार रुपये अनुदानात दोन लाख ते तीन लाखांपर्यत वाढ करण्यात यावी, अशा मागण्या करण्यात आल्या.

जातपंचायतीवर मोक्का लावावा
जातपंचायत ही संघटित गुन्हेगारी असून त्यावर मोक्का लावण्यात यावा. यासंदर्भात प्रकरण तडीस नेण्यासाठी सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली.