आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जात पंचायत सदस्यांवर आणखी एक गुन्हा; लातूर पोलिस घेणार ताबा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- जात पंचायतीने कुटुंबावर बहिष्कार घातल्याप्रकरणी लातूरच्या एमआयडीसी पोलिस ठाण्यात शनिवारी (दि. 6) या प्रकरणी नाशिकमध्ये पोलिस कोठडीत असलेल्या 11 जणांवर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला. या संशयितांचा ताबा घेण्यासाठी पोलिसांचे पथक सोमवारी (दि .8) नाशिकमध्ये दाखल होणार आहे.

धामणगाव (ता. फुलंब्री, जि. औरंगाबाद) येथील गणेश विठ्ठल धुमाळ (ह.मु. लातूर) यांनी दिलेल्या फिर्यादीतनुसार त्यांनी लातूर येथील शिवाजी जोशी यांच्या मुलीशी विवाह केला, तेव्हापासून जातपंचायतीने त्यांच्यावर बहिष्कार घातला होता. धुमाळ यांच्या फिर्यादीवरून दिलीप शिंदे, दामोधर हिंगमिरे, काशीनाथ हिंगमिरे (रा. औरंगाबाद) व नारायण धुमाळ, लक्ष्मण शिंदे, भास्कर शिंदे, विनायक शिंदे, शिवाजी कुंभारकर, रामनाथ धुमाळ, भीमा धुमाळ, मधुकर कुंभाकर (रा. नाशिक) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्व जणांवर नाशिक आणि औरंगाबाद येथे अशाच स्वरूपाचे गुन्हे दाखल असून, सध्या ते पोलिसांच्या ताब्यात आहेत.