आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘जेईई’च्या परीक्षा अर्जासाठी गुरुवारपर्यंत मुदत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड - येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्य शासनाची अभियांत्रिकी अभ्यासक्रमांची एमटीसीईटी ही सामाईक परीक्षा रद्द करण्यात आली आहे. त्याऐवजी राज्यातील शासकीय व खासगी अभियांत्रिकीतील सर्व अभ्यासक्रमांचे प्रवेश राष्ट्रीय पातळीवरील जॉइंट एंड्स एक्झामिनेशन (जेईई) मेन या सामाईक प्रवेश परीक्षेमार्फत होतील. जेईई परीक्षा अर्जाची मुदत 26 डिसेंबर 2013 पर्यंत आहे, अशी माहिती जिल्हा समन्वय अधिकारी प्रा. प्रमोद कोचुरे यांनी दिली.

ही परीक्षा ऑफलाइन व ऑनलाइन या दोन प्रकारे होणार आहे. ऑफलाइन परीक्षा 6 एप्रिल 2014 रोजी, तर ऑनलाइन परीक्षा 9 ते 19 एप्रिल 2014 या कालावधीत होईल.