नाशिक- पुढील शैक्षणिक वर्षापासून अभियांत्रिकी प्रवेशासाठी एमटी-सीईटीऐवजी जेईई (जॉइंट एंट्रन्स एक्झाम) ही राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा अनिवार्य करण्यात आली आहे. त्यासाठी अर्ज भरण्याची गुरुवारी (दि. 26) शेवटची मुदत आहे.
गेल्या वर्षीच अनिवार्य केलेली जेईई परीक्षा ऐनवेळी जाहीर केल्याने अंमलबजावणी योग्य पद्धतीने झाली नाही. खासगी महाविद्यालयांच्या संघटनेने त्यांच्या महाविद्यालयातील प्रवेशासाठी स्वतंत्र परीक्षा ठेवली.
राज्यातील काही खासगी विद्यापीठांनी अभ्यासक्रम आणि परीक्षा, तसेच निकालाच्या सोयीनुसार अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेचे स्वतंत्र आयोजन केले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना एकाच अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी दोनपेक्षा अधिक परीक्षा द्याव्या लागल्या होत्या.
यंदाही त्याची गरज नाही, मात्र यावेळी सुरुवातीपासून नियोजन केल्याने शैक्षणिक आणि मानसिक तयारी पुरेशी झाली आहे. जेईई परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शासकीय, अनुदानित, खासगी महाविद्यालयात प्रवेश घेता येईल. सीबीएससीची एकाच वेळी परीक्षा देशभर होणार असल्याने देशात कुठल्याही कॉलेजात प्रवेश घेता येईल.