आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेईई’त गुणांची सक्ती नाही; अभियांत्रिकी प्रवेशासाठी 50 टक्के गुणांची अट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी बारावीतील ‘पीसीएम’ ग्रुपमध्ये 50 टक्के गुणांची पात्रता आवश्यक आहे, मात्र जेईई मेन्सला 50 टक्के गुण असणे अनिवार्य नाही. यात शून्य अथवा एक गुण पडला असला तरीही विद्यार्थी अभियांत्रिकीच्या प्रवेशास पात्र असल्याचे ‘डीटीई’च्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे पालकांमध्ये या प्रवेशाबाबत असलेला संभ्रम आता दूर झाला आहे.

यंदापासून अभियांत्रिकीचा दर्जा वाढविण्यासाठी प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या बारावी विज्ञान गुणांच्या पीसीएम (फिजिक्स, केमेस्ट्री, मॅथ्स्) या विषयांच्या एकुण टक्केवारीत पाच गुणांनी वाढ केली आहे. गेल्या वर्षी पात्रता निषक हे सर्वसाधारण गटातील विद्यार्थ्यांसाठी 45 होते ते यंदा 50 टक्के करण्यात आले आहे. तर मागासवर्गीयांसाठी 40 गुणांवरुन ते 45 करण्यात आले आहे. त्यामुळे हे निकष पूर्ण करणारे विद्यार्थीच अभियांत्रिकी प्रवेशासाठी पात्र ठरणार आहे. तसेच मागील वर्षी जसे जेईईत शुन्य गुण मिळाले असतानाही संबधित विद्यार्थी अभियांत्रिकीतील शाखांसाठी पात्र ठरले होते. त्याच पद्धतीने यंदाही ते पात्र असतील असे तंत्रशिक्षण विभागाचे स्पष्ट करत संकेतस्थळावरही त्याची माहीती प्रसिध्द केली आहे.

50 गुणांची अट : नॉर्मलायझेशनचा फॉर्म्युला शासनास सादर करण्यात आला आहे. मात्र तो अद्याप मान्य केला नाही. परंतु अभियांत्रिकी प्रवेशासाठी जेईई मेन्स परीक्षा देणे अनिवार्य आहे. पीसीएमला मात्र सर्वसाधारण गटासाठी 50 आणि मागासवर्गीय 45 गुणांची अट आहे, असे तंत्रशिक्षणचे सहसंचालक डॉ. डी. आर. नंदनवार यांनी सांगितले.