आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाळपोळीची सीआयडी चौकशी करा : भुजबळ

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - दुचाकी व चारचाकीचे जाळपोळ सत्र राबवून सत्ताधा-यांना बदनाम करण्याचे राजकीय षड्यंत्र रचले जात असल्याचा आरोप करीत खासदार समीर भुजबळ यांनी या गुन्ह्यांची राज्य अन्वेषण विभागामार्फत (सीआयडी) चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याकडे केली आहे.
भुजबळ यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे. गुन्हेगारांना पायबंद घालण्यात पोलिस अपयशी ठरले आहेत. गृहमंत्री व गृहराज्यमंत्री दोघांनी गुन्हेगारी नियंत्रणात आणण्याचे आदेश देऊनही स्थानिक पोलिसांकडून त्याची अंमलबजावणी झालेली नाही. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात अराजक पसरवण्याचे प्रकार सुरू आहेत. विकासाकडून अन्यत्र लक्ष वळविण्यासाठी दहशत माजवण्याचे प्रकार घडत आहेत. विरोधकांकडेही प्रचारासाठी अन्य मुद्दे नसल्यामुळे सत्ताधा-यांवर जाणूनबुजून आरोप केले जात आहेत.