आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अबकारी कराविराेधात सराफ व्यावसायिकांचा बंद पुन्हा सुरू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - अबकारी कर कायद्यातील जाचक अटींवर अद्याप तोडगा निघाल्याने देशातील सराफांची दुकाने सोमवार(दि. २५)पासून पुन्हा तीन दिवस बंद राहणार आहेत. साेमवारी दिल्लीच्या जंतरमंतरवर महाराष्ट्र राज्य सराफ सुवर्णकार फेडरेशनचे आॅल इंडिया अॅक्शन कमिटीचे अध्यक्ष अॅड. फत्तेचंद राका यांच्या नेतृत्वाखाली धरणे अांदाेलन करण्यात अाले. त्यात देशभरातील सुवर्णकारांनी सहभाग घेतला. दरम्यान, दाेन-तीन दिवसांत काही सकारात्मक निर्णय हाेण्याची अाशा स्थानिक सराफी व्यावसायिकांनी व्यक्त केली. साेमवारी शहरातील काही काॅर्पोरेट कंपन्यांचे शाेरूम्स वगळता सराफी पेढ्या बंद राहिल्या.
सराफांच्या दोन्ही संघटनांनी दिलेल्या प्रस्तावातील काही मुद्यांवर अद्याप चर्चा झालेली नसून, बुधवारपर्यंत त्यावर चर्चा हाेणे अपेक्षित अाहे. मात्र, त्यातून तोडगा निघाला नाही तर पुढे बंद कायम सुरू ठेवण्याबाबतचा निर्णय त्याच दिवशी घेतला जाईल, असे राका यांनी सांगितले.
देशभरातील सराफांनी अबकारी कराविरोधात मार्चपासून जवळपास दीड महिने बेमुदत बंद पुकारला होता. मात्र, त्यानंतर संघटनेने केंद्र सरकारला ३४ मागण्यांचा नवीन प्रस्ताव दिला त्यानंतर बंद मागे घेत सरकारला या प्रस्तावावर चर्चेसाठी २४ एप्रिलची मुदत दिली. दरम्यान, मागील दहा दिवस केंद्र सराफांच्या प्रतिनिधींमधील चर्चेत साधारण ७० टक्के मुद्यांवर सकारात्मक चर्चा झाली असून, काही मुद्यांवर अद्याप चर्चा झाली नाही, ती बुधवारपर्यंत होणार आहे. त्यामुळे पुन्हा सराफा व्यावसायिक तीन दिवसांच्या संपावर गेले असून, बुधवारी संपाची पुढील दिशा निश्चित हाेणार अाहे.