आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे नोकरीची मिळाली संधी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- के.व्ही. एन. नाईक शिक्षण प्रसारक संस्थेच्या तंत्रनिकेतन महाविद्यालयातील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे नोकरीची संधी प्राप्त झाली आहे. पुण्यातील कंपनीने आठ विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेऊन ट्रेनी इंजिनिअर या पदासाठी नियुक्ती केली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा संस्थेच्या वतीने नुकताच सत्कार करण्यात आला.
के.व्ही.एन. नाईक संस्थेच्या तंत्रनिकेतन महाविद्यालयात कॅम्पस इंटरव्ह्यूचे दरवर्षी आयोजन करण्यात येते. यंदाही महाविद्यालयात पार पडलेल्या या कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे अंतिम वर्षाच्या आठ विद्यार्थ्यांची पुण्यातील बजाज ऑटो, आकुर्डी शाखा चाकण शाखा, टाटा मोटर्स लि. या कंपनीत चांगल्या पॅकेजवर नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे. महाविद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांना कॅम्पस इंटरव्ह्यूच्या तयारीसाठी विशेष मार्गदर्शनदेखील करण्यात आले होते.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार : याकॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेचे उपाध्यक्ष प्रभाकर धात्रक, सरचिटणीस हेमंत धात्रक, सहचिटणीस अॅड. तानाजी जायभावे, विश्वस्त डॉ. धर्माजी बोडके संचालक संपतराव वाघ आदी मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष प्रभाकर धात्रक यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांना यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी प्रामाणिकपणे मेहनतीने कौशल्यपूर्ण अभ्यास करण्याचा सल्ला दिला. तर, संस्थेचे सहचिटणीस अॅड. तानाजी जायभावे यांनी देशात औद्योगिक क्षेत्रात होणारा बदल आमूलाग्र असून, त्यासाठी जिद्दीने परिश्रम घेतले, तरच हमखास यशप्राप्ती होईल, असे सांगितले.
यानंतर विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करताना आपल्या यशात संस्थेने दिलेल्या चांगल्या शिक्षणाचा शिक्षकांचा सहभागच अधिक महत्त्वाचा असल्याचे प्रांजळ मत व्यक्त केले. या कॅम्पस इंटरव्ह्यूसाठी महाविद्यालयाचे प्रा. पी. पी. भिरुड, प्रा. के. बी. धात्रक, प्रा. व्ही. जे. बोडके, प्रा. बी. जी. श्रीगन, प्रा. एन. पी. मुजुमदार, प्रा. व्ही. एल. सानप प्रशांत पाटील यांचे सहकार्य लाभले.
या विद्यार्थ्यांची झाली मुलाखतीद्वारे निवड
के.व्ही. एन. नाईक महाविद्यालयात झालेल्या या कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे गौरव परदेशी, ऋषिकेश बोऱ्हाडे, समाधान भवर, ऋषभ मितकर, यश सुडके, ऋषिकेश लभडे, विशाल आभाळे, वैभव अहिरराव यांची निवड झाली.
तीन वर्षांत ६७ विद्यार्थ्यांना प्लेसमेंट
महाविद्यालयाच्यातंत्रनिकेतनात सुरू करण्यात आलेल्या ट्रेनिंग आणि प्लेसमेंट या उपक्रमांतर्गत विविध कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांची नियुक्ती झालेली आहे. गेल्या तीन वर्षांत विविध कंपन्यांमध्ये एकूण ६७ विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळाली आहे.