आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृषीनगर जाॅगिंग ट्रॅकवर पीटीसीच्या तलावातील पाणी; वर्षापासून जाॅगर्स हैराण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- वर्षभरापासून कृषीनगर जाॅगिंग ट्रॅकवर मागेच असलेल्या महाराष्ट्रू पाेलिस प्रबाेधिनीच्या मैदानातील तलावातून (पीटीसी) येणारे पाणी जाॅगर्सच्या अाराेग्यावर बेतत अाहे. डासांचे साम्राज्य, पालापाचाेळा कुजून येणारी दुर्गंधी अाता नित्याचीच झाली अाहे. याविषयी लाेकप्रतिनिधी मात्र नेहमीप्रमाणेच दुर्लक्ष करत अाहेत. गेल्या वर्षभरापासून हा त्रास जाॅगर्सला सहन करावा लागात अाहे. पण, तक्रारीकडे काेणीही लक्ष देत नाही. या ट्रॅकच्या दुरवस्थेवर टाकलेला हा प्रकाशझाेत...

 

कृषी नगर येथील प्रशस्त जाॅगिंग ट्रॅकदेखील महापालिका प्रशासनाकडून दुर्लक्षितच असून, या ठिकाणी येणाऱ्या जाॅगर्सचेच अाराेग्य धाेक्यात येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. या ठिकाणी जवळच असलेेल्या पोलिस प्रशिक्षण मैदानावरील जलवाहिनीचे पाणी दररोज मोठ्या प्रमाणावर येत असल्याचे जाॅगिंग ट्रॅकवरच्या काही भागात पाण्याचे डबके साचले अाहे.  त्याचबरोबर संपूर्ण परिसरात या पाण्यामुळे कचरा कुजला अाहे. यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला असून, रोगराई पसरत आहे. या ठिकाणी अनेक शासकीय अधिकारीदेखील जाॅगिंगसाठी येत असतानाही िकत्येक िदवसांपासून असलेले हे चित्र पालटत नसल्याने अाश्चर्य व्यक्त केले जात अाहे. 


महापालिका प्रशासनाने या जाॅगिंग ट्रॅकच्या नियमित देखभाल-स्वच्छतेकडे लक्ष देणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात मात्र याउलट चित्र अाहे. या पाण्यामुळे ट्रॅकवर अस्वच्छता, दुर्गंधीच्या विळख्यात जाॅगिंग ट्रॅक असताना पालिका कर्मचारी मात्र या ठिकाणी फिरकतही नसल्याचे चित्र आहे. नियमित स्वच्छता नसल्याने जाॅगर्सची गैरसाेय हाेत असल्याच्याही तक्रारी अाहेत. त्याचबरोबर ट्रॅकवर पडणारा झाडांचा पालापाचोळा उचलला जात नसल्याने अनेक ठिकाणी अस्वच्छता पसरली अाहे. परिणामी जाॅगर्सना दुर्गंधीचाही सामना करावा लागत अाहे.

 

वर्षभरापासून पाणी सुरूच

गेल्या वर्षभरापासून कृषीनगर जाॅगिंग ट्रॅकवर पाणी येत असल्याने याबाबत लोकप्रतिनिधींसह अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष केले जात आहे. या पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. जाॅगिंग ट्रॅकवर पोलिस प्रशिक्षण मैदानावरून येणाऱ्या या पाण्यासंदर्भात प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची उपाययोजना केली जात नसल्यानेे संताप व्यक्त केला जात अाहे. 


आैषध फवारणी जाते वाया
शुक्रवारी सकाळी जाॅगिंग ट्रॅकवर पाहणी केली असता या ठिकाणी महापालिकेच्या मलेरिया विभागाकडून आैषध फवारणीचे काम सुुरू होते. यावेळी पश्चिम विभागाचे मलेरिया अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता, या ठिकाणी रोज आैषध फवारणी करूनही काहीच उपयोग होत नाही. कारण पाणी मोठ्या प्रमाणावर येत असल्याने आैषध वाहून जाते, असे त्यांनी सांगितले.

 

दुरवस्थेकडेही दुर्लक्षच

जाॅगिंग ट्रॅकमध्ये बसविण्यात आलेल्या आकर्षक दिव्यांचीही दुरवस्था झालेली अाहे. काही दिवे चालूच होत नसल्याने काही ठिकाणी अंधार असतो. यामुळे जाॅगर्सला संध्याकाळी या ठिकाणी फिरताना अडचणींचा सामना करावा लागतो. तर काही दिव्यांमधील लाइटच गायब अाहेत. वायरही कुजल्या अाहेत. 

 

पालापाचोळा राेजचाच
ट्रॅकच्या दुतर्फा पालापाचोळा साचला अाहेत. ट्रॅकवर येणाऱ्या पाण्यामुळे अस्वच्छता वाढल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. जाॅगिंग ट्रॅकवरील या समस्या गेल्या काही वर्षांपासून कायम असून याबाबत अधिकाऱ्यांना निवेदनेदेखील देण्यात आलेली आहेत. मात्र, अाजही परिस्थिती  ‘जैसे थे’ आहे.

 

पुढील स्‍लाइडवर फोटोज आणि अधिक माहिती...

 

बातम्या आणखी आहेत...