आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाेकाकुल वातावरणात पत्रकार प्रियांका डहाळेंना अखेरचा निरोप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- ‘दिव्य मराठी’च्या मुंबई कार्यालयातील सांस्कृतिक प्रतिनिधी प्रियांका सुनील डहाळे (२६) यांच्यावर मंगळवारी येथील अमरधाममध्ये अत्यंत शाेकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात अाले. या वेळी अनेकांना अश्रू अनावर झाले हाेते.
साखरपुड्यासाठी मुंबईहून साेमवारी रात्री कुल कॅबने नाशिककडे येत असताना प्रियांका यांच्या गाडीला अपघात झाला हाेता. यात त्यांचा मृत्यू झाला. ही बातमी कळताच शहरातील अनेक पत्रकार व मान्यवरांनी प्रियांका यांच्या घरी जाऊन डहाळे परिवाराचे सांत्वन केले. त्यांना धीर दिला. त्यात प्रा. डाॅ. वृंदा भार्गवे, नृत्यांगना रेखा नाडगाैडा, पत्रकार दीप्ती राऊत, अपर्णा वेलणकर, मेघना ढाेके, वैशाली बालाजीवाले, मुक्ता चैतन्य, सई बांदेकर अादींचा समावेश हाेता.
मंगळवारी अंत्यसंस्कारावेळी पत्रकारिता व सांस्कृतिकसह सर्वच क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित हाेते. यात कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे कार्यवाह लाेकेश शेवडे, सार्वजनिक वाचनालयाचे उपाध्यक्ष नरेश महाजन, नाट्यगृह सचिव सुरेश गायधनी, ज्येष्ठ रंगकर्मी सदानंद जाेशी, लेखक दत्ता पाटील, दिग्दर्शक सचिन शिंदे, महाराष्ट्र टाइम्सचे निवासी संपादक शैलेंद्र तनपुरे, पुणे विद्यापीठातील संज्ञापन पत्रकारिता विभागाचे विश्राम ढाेले, श्रीकांत बेणी, विश्वास ठाकूर, काॅम्रेड राजू देसले, नगरसेवक विक्रांत मते, कवी कैलास पगारे अादींचा समावेश हाेता.

या वेळी प्रियांका यांनी कमी वयात घेतलेली भरारी अाणि असे अर्ध्यातच निघून जाणे म्हणजे तिच्या कुटुंबीयांचीच नव्हे तर नाशिकच्या पत्रकारिता, साहित्य सांस्कृतिक क्षेत्राची माेठी हानी झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात अाली. साेशल मीडियावरही या घटनेने अनेकांनी हळहळ व्यक्त केली जात हाेती..

माध्यमांतर टिपणारी...
प्रियांका ही अतिशय संवेदनशील पत्रकार अाणि लेखिका. माझ्यासारख्या वेगळ्या वाटेवर चाललेल्या कलावंताची मुलाखत टिपताना तिने बदलती माध्यमं अाणि माध्यमांतर हे टिपण्याचा जाे काही प्रयत्न केला हाेता ताे विचार करायला लावणाराच हाेता. तिचं वय अाणि ती करत असलेलं काम हे अवाक् करणारं हाेतं. तिच्या कामातून नवाेन्मेष पुढे येत हाेते. तिच्या अशा जाण्याने एकूणच खूप माेठी पाेकळी निर्माण झाली अाहे, अशा भावना लाेकशाहीर संभाजी भगत यांनी व्यक्त केल्या.
बातम्या आणखी आहेत...