आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...तर परीक्षेवर बहिष्कार; शिक्षकांचा उपसंचालक कार्यालयावर मोर्चा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड- कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी नाशिक विभागीय कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने सोमवारी शिक्षण उपसंचालक कार्यालयावर धडक मोर्चा काढला. मागण्यांबाबत निर्णय होत नाही तोपर्यंत बारावी परीक्षेच्या कामकाजावर बहिष्काराचा इशारा या वेळी देण्यात आला.

शिक्षण उपसंचालक तुकाराम सुपे यांनी निवेदन स्वीकारले. बिटको कॉलेजसमोरून राज्य महासंघाचे कार्याध्यक्ष प्रा. एस. के. शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निघालेला हा मोर्चा दत्तमंदिर, बिटको, प्रेस मेनगेटमार्गे जाऊन त्याचे सभेत रूपांतर झाले. शिक्षक आमदार अपूर्व हिरे यांनी याविषयी विधान परिषदेत आवाज उठवणार असल्याचे स्पष्ट केले. निफाडचे आमदार अनिल कदम यांनी शिक्षकांच्या मागण्यांना पाठिंबा दिला. मोर्चात नाशिक, धुळे, जळगाव व नंदुरबार जिल्ह्यातील शिक्षक सहभागी झाले होते. शिष्टमंडळात अध्यक्ष प्रा. के. एन. अहिरे, विभागीय अध्यक्ष प्रा. जे. एस. अहिरराव, प्रा. बी. ए. पाटील, प्रा. बी. जी. बागुल, प्रा. डी. डी. पाटील, प्रा. रमेश शिंदे, प्रा. एन. जे. पाटील, प्रा. विजय पवार यांच्यासह शिक्षक सहभागी झाले होते.

या आहेत मागण्या
सुधारित त्रिस्तरीय वेतनर्शेणी 1996 पासून लागू करावी.
माध्यमिकप्रमाणे तुकडी टिकवण्यासाठी विद्यार्थी संख्येची अट शिथिल करून पिनलकट रद्द करावा.
कायम विनाअुनदानित तत्त्व रद्द करून त्वरित अनुदान द्यावे.
सहाव्या वेतन आयोगानुसार केंद्राप्रमाणे वेतनर्शेणी व ग्रेड पे द्यावी.
1166 वाढीव पदांना मान्यता द्यावी.
विनाअनुदान काळातील सेवा वरिष्ठ आणि निवड र्शेणीसाठी ग्राह्य धरावी.
संपकालीन रजा पूर्ववत खात्यावर जमा कराव्या.
2005 पूर्वीच्या नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी.
24 वर्षे सेवा झालेल्या सर्व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना विनाअट निवडर्शेणी द्यावी.
वैद्यकीय प्रवेशासाठी ‘नीट’ऐवजी एमएचटी-सीईटी घ्यावी.
उपप्राचार्य, पर्यवेक्षक यांच्या ग्रेड पेमध्ये वाढ करावी.