आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्वाल्या खून प्रकरण, शेट्टीसह तिघांना पाच दिवस पोलिस कोठडी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सराईत गुन्हेगार ज्वाल्याच्या खून प्रकरणात अटक केलेले भाजपचे नगरसवेक हेमंत शेट्टी यांच्यासह तीन संशयितांना पाच दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. या प्रकरणात सहभागी राकेश कोष्टी कुंदन परदेशी यांना सकाळी मध्यवर्ती कारागृहातून ताब्यात घेण्यात आले. शाम महाजन यास शुक्रवारीच अटक करण्यात आली होती. 
 
जालिंदर ऊर्फ ज्वाल्या उगलमुगले याचा ऑक्टोबर २०१५ मध्ये खून झाल्याचे कोम्बिंग ऑपरेशननंतर उघड झाले होते. पोलिसांनी कोम्बिंगमध्ये पकडलेले संशयित अविनाश कौलकर रोहित कडाळे यांची सखोल चौकशी केली. त्यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी ज्वाल्याला परदेशी, कोष्टी महाजन यांच्या ताब्यात दिले. ज्वाल्याला मद्य पाजून संशयीतांनी त्यास मौजे उभाडे (ता. इगतपुरी) येथे नेऊन त्याचा खून केला पेट्रोल टाकून जाळून टाकले. या प्रकरणी घोटी पोलिस ठाण्यात अर्धवट जळालेल्या मृतदेहाची नोंद आहे. पोलिसांनी महाजनला शुक्रवारी (दि. २६) सकाळी अटक केली. या प्रकरणात प्रभाग चे नगरसेवक शेट्टी यांचाही सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्या इशाऱ्यावर ज्वाल्याचा खून झाल्याची माहिती संशयितांनी पोलिसांना दिल्याने रात्रीच शेट्टी यांना वाघाडी येथे अटक करण्यात अाली. 

निकमखुनातील संशयितास कोठडी किरणनिकम खून प्रकरणात अटक केलेल्या संतोष पगारे यास तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. यातील तीन संशयित फरार आहेत. 

निकम ज्वाल्याच्या खून प्रकरणानंतर पंचवटीमधील टोळ्यांमध्ये ठिणगी पडली आहे. निकम, कोष्टी, परदेशी आणि महाजन, शेट्टी समर्थकांमध्ये वादाची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली 
नगरसेवक हेमंत शेट्टीसह अन्य आरोपींना नेताना पोलिस. 
 
बातम्या आणखी आहेत...