आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jyotishy Ashok Pawar Says Priyanka Gandhi Pm In Future

प्रियांका पंतप्रधान, तर पवार उपपंतप्रधान!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - सन 2014 मध्ये होणा-या लोकसभा निवडणुकीनंतर प्रियांका गांधी पंतप्रधान, तर शरद पवार उपपंतप्रधानपदावर विराजमान होतील. महाराष्ट्रात मनसे अन्य पक्षांचा पाठिंबा घेऊन सत्ता काबीज करेल आणि मुख्यमंत्री होतील बाळा नांदगावकर.. नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळांच्या नशिबात मात्र मुख्यमंत्रिपदाचा योग नाही... ही भाकिते आहेत, ज्योतिषी अशोक विठ्ठल पवार यांची.
चेहरा पाहून ज्योतिष सांगणारे पवार कडा सहकारी साखर कारखाना (ता. आष्टी, जि. बीड) येथील रहिवासी आहेत. त्यांनी आतापर्यंत अनेक राजकीय नेते, पक्ष, सिनेकलावंतांसह नागरिकांचे भविष्य सांगितले असून, बहुतांश तंतोतंत खरेही ठरले असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. वयाच्या नवव्या वर्षी तनपुरे महाराजांकडून दीक्षा मिळाल्यापासून हे शास्त्र आत्मसात केल्याचे त्यांनी सांगितले.
सध्याच्या राजकीय स्थितीवर भाष्य करताना पवार म्हणाले की, प्रणव मुखर्जीच राष्ट्रपती होतील; पण ते कार्यकाळ पूर्ण करू शकणार नाहीत. मनमोहनसिंगही त्यांचा कार्यकाळ पूर्ण करू शकणार नाहीत. घोटाळ्यातील मंत्र्यांना तुरुंगाची हवा खावी लागणार असून, काहींचा हृदयविकाराने मृत्यूही होणार आहे. ‘छगन भुजबळ यांनी पक्ष सोडला तर त्यांना पदामागून पदे मिळतील,’ असे आपण सांगितल्याचे नमूद करून ते म्हणाले, की त्यानंतर भुजबळांनी पक्षांतर केले अन् उपमुख्यमंत्रिपदापर्यंत मजल मारली. मुख्यमंत्रिपद मात्र त्यांच्या नशिबात नाही. आदर्श प्रकरणी अशोक चव्हाण यांना तुरुंगात जावे लागेल. यंदा पाऊस लांबला असला तरी त्याचे एकंदर प्रमाण चांगलेच राहणार आहे, असे सांगून ‘21 डिसेंबर 2012 हा दिवस देशासाठी दुर्दैवी नैसर्गिक आपत्तींचा ठरणार असून, मोठ्या प्रमाणावर जीवितहानी या काळात होणार आहे. भूकंपासह अतिवृष्टीची आपत्ती त्यावेळी कोसळेल,’ असा दावा त्यांनी केला.