आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

11 विद्यार्थ्यांना मिळाले तीन लाखांचे पॅकेज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी मिळावी, या उद्देशाने के. के. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये बुधवारी ११ विद्यार्थ्यांची निवड झाली. पुण्यातील रामकृष्ण आयटी कन्सल्टिंग या आयटी क्षेत्रातील कंपनीने मुंबई पुण्यातील प्रकल्पांसाठी या विद्यार्थ्यांची निवड केली असून, त्यांना तीन लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज दिले आहे.
रामकृष्ण आयटी कन्सल्टिंग कंपनीतर्फे के. के. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयात दोन दिवसीय कॅम्पस इंटरव्ह्यू घेण्यात आली. त्यात जिल्ह्यातील ११ महाविद्यालयांतील ३०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. कंपनीचे संचालक विवेक कुलकर्णी, शिल्पा प्रभू, इ-जेस्ट कंपनीचे एचआर विभागप्रमुख राजेंद्र बागटीवाले, महेश बनकर यांनी विद्यार्थ्यांची मुलाखत घेतली. कॅम्पससाठी प्राचार्य डॉ. केशव नांदूरकर, प्लेसमेंट सेलप्रमुख डॉ. प्रमोद शहाबादकर यांच्या मार्गदर्शनाखाली कॅम्पस इंटरव्ह्यू झाल्या. प्री-प्लेसमेंट टॉक लेखी परीक्षेतून १३० विद्यार्थ्यांची ग्रुप डिस्कशनसाठी निवड झाली होती. त्यानंतर ५८ विद्यार्थ्यांची टेक्निकल इंटरव्ह्यूसाठी निवड झाली त्यातून ११ विद्यार्थ्यांची अंतिम निवड करण्यात आली.
करिअर

यांना मिळाली करिअरची संधी
चेतनझाडे, चैताली पाळदे, नेहा मोरे, मानसी जहागीरदार (सर्व के. के. वाघ कॉलेज), पंखुडी गुप्ता (भुजबळ नॉलेज सिटी), स्नेहलता बागुल, हरनीत सलुजा, तेजस्विनी जाध‌व, सुचिता भालेराव, अंजली चत्तर (एसएनजेबी कॉलेज), निकिता चौधरी (संदीप फाउंडेशन)