आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

के. के. वाघ महाविद्यालयात अभियांत्रिकीच्या 46 विद्यार्थ्यांना ‘आयटी’ची ऑफर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक: अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी मिळावी, या उद्देशाने के. के. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये ४६ विद्यार्थ्यांची निवड झाली असून, विद्यार्थ्यांना वार्षिक तीन लाख ५० हजारांपर्यंतची प्लेसमेंटची ऑफर मिळाली आहे. पुणे येथील आयटी क्षेत्रातील प्रसिद्ध कंपनी केपीआयटी टेक्नोलॉजी कंपनीने या विद्यार्थ्यांची निवड केली अाहे. 
 
के. के. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयात कॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन करण्यात आले होते. पुणे येथील आयटी क्षेत्रातील केपीआयटी या कंपनीने विविध पदांकरिता विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. यात अभियांत्रिकीच्या विविध विद्याशाखांसह एमसीएच्या विद्यार्थ्यांनीही सहभाग घेतला होता. प्राचार्य डॉ. केशव नांदूरकर यांनी विद्यार्थ्यांना निवडप्रक्रियेविषयी मार्गदर्शन केले. 
 
या पूल कॅम्पसमध्ये १७५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. प्री-प्लेसमेंट टॉक, अॅप्टिट्यूड टेस्ट, टेक्निकल टेस्ट या निवडप्रक्रियांमधून महाविद्यालयातील ११० विद्यार्थ्यांची अंतिम मुलाखत प्रक्रियेसाठी निवड झाली.
 
कंपनीच्या वतीने झालेल्या अंतिम मुलाखत प्रक्रियेतून ४६ विद्यार्थ्यांची अंतिम निवड झाली. त्यांना वार्षिक तीन लाख २५ ते ५० हजार रुपयांपर्यंतचे वार्षिक पॅकेजसची अॉफर मिळाली आहे. या वेळी कॉम्प्युटर विभागप्रमुख डॉ. एस. एस. साने यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ, विश्वस्त चांगदेवराव होळकर, अशोक मर्चंट, समीर वाघ, सचिव के. एस. बंदी, प्लेसमेंट विभागप्रमुख डॉ. पी. के. शहाबादकर, पी. डी. भांबरे यांचे मार्गदर्शन लाभले. 
 
सर्वच शाखांना संधी 
पुणे येथील केपी आयटी कंपनीत के. के. वाघ अभियांत्रिकीच्या शाखेच्या ४६ विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळाली असून, त्यात १२ विद्यार्थी हे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागाचे आहेत. तर, इलेक्ट्रॉनिक्स शाखेचे विद्यार्थी, १३ विद्यार्थी कॉम्प्युटर, १० आयटी विभागाचे आणि विद्यार्थी एमई झालेले आहेत.