आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संत कबीरांच्या दाेह्यांचा संगीत धमाका, ‘कबीर कॅफे’च्या सूर-तालांतून एकात्मतेचा संदेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नीरज आर्या. - Divya Marathi
नीरज आर्या.
नाशिक - गुलाबी थंडीची चादर पांघरायला शहराने सुरुवात करताच ‘कहत कबीर सुनो रे साधू’ ही ओळ प्रत्येकाच्या ओठांवर तरळते अन् सुरू होतो कबीर कॅफेचा लाइव्ह म्युझिक कॉन्सर्ट... संत कबीर यांच्या अर्थपूर्ण दोह्यांना कबीर कॅफेतील सुप्रसिद्ध तरुण संगीतप्रेमींची मिळालेली जादुई सूर-संगीताची साथ नाशिककरांना मनसोक्त डाेलायला-थिरकायला भाग पाडणारी ठरली. तरुणाईवर राज्य करणारे संगीत प्रकार आणि अाबालवृद्धांना त्यांच्या भाषेत तत्त्वज्ञान सांगणारे संत कबीर यांना एकत्रित भेटण्याचा हा योग ‘दिव्य मराठी’च्या लिटरेचर फेस्टिव्हलच्या निमित्ताने रविवारी (दि. ५) आला.
 
गंगापूररोडवरील विश्वास लॉन्स येथे झालेल्या या कार्यक्रमाला नाशिककर रसिकांनी भरघाेस प्रतिसाद दिला. नीरज आर्या या प्रमुख गायकाला तितक्याच ताकदीने व्हायोलिन वादक मुकुंद रामस्वामी, वादक रमण अय्यर (मँडोलिन), वीरेन सोलंकी (ड्रम परक्यूशन्स)आणि ब्रिट्टो के. सी. (गिटार) या चमूने नाशिककरांच्या मनावर अधिराज्य गाजवले.
 

चदरिया झीनी रे झीनी
राम नाम रस भीनी...

याभजनाने मैफलीला प्रारंभ झाला. एरवी भजनांकडे काहीसे दुर्लक्ष करणारी तरुणाई नीरजच्या सुरावटींवर थिरकत होती. नुसतीच थिरकत नव्हती तर गुणगुणतदेखील होती. नशीब आणि कर्तव्य यामधील फरक ओळखायला शिकवणाऱ्या या भजनाने सुरुवात गोड केलीच; शिवाय थंडीने कुडकुडलेल्या नाशिककरांमध्ये ऊर्जाही भरली.
 
सुनतानही धून की खबर,
अनहत का बाजा बाजता...

या कबीराच्या दोह्याला संगीत रजनीत मिळालेले जादुई सूर अन् संगीताची जोड चारचाँद लावून गेली. मीपणापेक्षा धर्म मोठा आहे, पण धर्म भेद करण्यासाठी नाही तर एकत्र ठेवण्यासाठी आहे,’ असा मोलाचा संदेशही यानिमित्तानं प्रभावीपणे देण्यात कबीर कॅफे बँड यशस्वी ठरला.
बादशाहो या चित्रपटातील ‘होशियार रहेना रे नगर में चोर आवेगा...’ या गाण्यालाही भरभरून दाद मिळाली. हे गाणे बॉलिवूडमध्ये वापरले गेल्याने स्टेजवर लाइव्ह ऐकताना प्रेक्षकांत आनंद लहर पसरली होती.
 
मनवाचन आणि जादू...
प्रारंभीअभिषेक आचार्य यांनी निवडक उपस्थितांना व्यासपीठावर निमंत्रित करीत त्यांची मने वाचली. मनातला नंबर, नावे ओळखणे, डोळ्यासमोरून गायब झालेली नोट संत्र्यामधून काढणे, शेकडो प्रेक्षकांमध्ये जाऊन त्यातील विशिष्ट एकाची चिट्ठी ओळखणे असे प्रकार त्यांनी आपल्या जादूने करून उपस्थितांना अवाक‌् केले. सुरुवातीला लोकांकडून चिठ्ठ्या लिहून घेत त्यातून एक चिठ्ठी घेऊन उपस्थित हजारो लोकांमधून ती चिठ्ठी कोणी लिहिली हे ओळखून दाखवले. तसेच, एका व्यक्तीला मंचावर बोलावून लहानपणीचे प्रेम आठवायला सांगितले मनात असलेल्या व्यक्तीचे नाव अभिषेक यांनी ओळखून दाखविले.
 
कबीर कॅफेचे प्रमुख गायक नीरज आर्या यांच्या म्हणण्यानुसार कबीर हा संत नाही, तर आपले म्हणणे मांडण्याची शक्ती बाळगणारा सामान्य माणूस होता. या शक्तीची अनुभूती सर्वांना समजेल अशा आणि आजच्या समाजरचनेशी निगडित भाषेत कबीर कॅफे सादर करण्याचा प्रयत्न करताे. ‘दिव्य मराठी’सारख्या क्रमांक एकच्या दैनिकाने लिटरेचर फेस्टसारख्या प्रतिष्ठित व्यासपीठावर आम्हाला संधी दिली, असे सांगत नीरज आर्या यांनी दैनिक भास्कर समूहाचे आभार मानले. मराठी भाषेचेही गोडवे गात त्यांनी ही भाषा आपल्याला येत नसल्याची खंत व्यक्त केली.
 
पुढील स्‍लाइडवर...अन‌् रसिकांनीही घेतला गायनानंद...
 
 
बातम्या आणखी आहेत...