आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महिलांना शिवीगाळ करणारे आमदार अनिल कदमांना होऊ शकते अटक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - ओळखपत्र विचारल्याने पिंपळगाव बसवंत येथील टोलनाक्यावर महिला कर्मचा-यांना शिवीगाळ करून धमकावणारे शिवसेना आमदार अनिल कदम यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते. याप्रकरणी कदमांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे.


नाक्यावरील महिला कर्मचा-यांनी गुरुवारी कदम यांची गाडी अडवली होती. तेव्हा कदम यांनी नियंत्रण कक्षात घुसून गोंधळ घातला. महिलांना शिवीगाळ करून विवस्त्र करण्याची धमकीही दिली. यानंतर व्यवस्थापक वसुंधरा राव यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी प्रारंभी अदखलपात्र गुन्हा दाखल केला. मात्र, नतर पोलिसांवर टीकेची झोड उठली. अखेर शनिवारी रात्री विनयभंग, विनापरवानगी कार्यालयात घुसून कामात अडथळा, दमदाटी, धमकी देणे व तोडफोड केल्याप्रकरणी गुन्हे दाखल झाले.