आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कैलास मुदलियार शिवसेनेच्या दरबारात, संजय राऊत गट सक्रिय झाल्याची चर्चा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महापालिका निवडणुकीचे वातावरण तापायला सुरुवात झालेली असतानाच गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या नेत्यांना पावन करून घेण्याची राज्यातील सत्ताधारी पक्षातील स्पर्धा थांबायला तयार नाही. अाता भाजपपाठाेपाठ शिवसेनेच्या दरबारात बहुचर्चित कैलास मुदलियार याने हजेरी लावत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. दरम्यान, कैलास याने पक्षप्रवेश केला नसल्याचे सांगत केवळ सदिच्छा भेट घेतल्याचा दावा करतानाच बंधू गिरीश मुदलियारने शिवसेनेत प्रवेश केल्याचे मान्य केले.

महापालिकेची सत्ता मिळवण्यासाठी केंद्र राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेना भाजपमधील संघर्ष दिवसागणीक वाढत अाहे. साम-दाम-दंड अशा सर्व नीती वापरून बळ वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू अाहेत. गेल्या महिन्यात महापालिकेच्या दाेन प्रभागांच्या पाेटनिवडणुकीत अपक्ष नगरसेवक तथा कुख्यात पवन पवार यास भाजपने पावन करून घेतले. पवार यांच्या पक्षप्रवेशावरून भाजपची कथित साधनशूचिता स्वच्छ प्रतिमेचा बुरखा फाटला हाेता. गुन्हेगारी नेत्यांना पक्षप्रवेश दिल्याचा मुद्दा त्यावेळी शिवसेनेनेही उचलून धरला हाेता. अाता शिवसेनेच्याच संपर्कात मुदलियार अाल्यामुळे त्यांची दुटप्पी भूमिका उघड झाली अाहे.

बुधवारी कैलास बंधू गिरीशसह उद्धव यांच्या भेटीसाठी गेला हाेता. यासंदर्भातील छायाचित्रे व्हाॅट‌्सअॅपद्वारे व्हायरल हाेताच खळबळ उडाली. यासंदर्भात शिवसेना पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी फारसे बाेलणे टाळले. दरम्यान, कैलास याने अापण सदिच्छा भेट घेतल्याचे सांगत शिवसेना प्रवेशाचा इन्कार केला. यापूर्वी छगन भुजबळ यांचा कट्टर कार्यकर्ता म्हणून, तसेच राष्ट्रवादीचा पदाधिकारी म्हणून मुदलियारची अाेळख हाेती. त्यानंतर मध्यंतरी विश्व हिंदू परिषदेचे प्रवीण ताेगडिया यांच्याही संपर्कात असल्यामुळे त्याचा भाजपमध्ये प्रवेश हाेताे का याकडे लक्ष लागले हाेते. अाता शिवसेनेशी संपर्क अाल्यामुळे मुदलियारच्या पुढील वाटचालीकडे लक्ष लागले अाहे.
संजयराऊत गट सक्रीय : छायाचित्रातमुदलीयार यांच्यासमवेत संजय राऊत हे दिसत असून या भेटीमागे त्यांचाच संबंध असल्याचे बाेलले जाते. नाशिकचे संपर्कप्रमुख अजय चाैधरी महानगरप्रमुख अजय बाेरस्ते अाहेत. त्यामुळे मुदलीयार यांच्यासमवेत उभय पदाधिकारी असणे अपेक्षित हाेते मात्र या दाेघांना डावलून थेट राऊत यांच्यामाध्यमातून मुदलीयार यांनी ठाकरे यांच्याशी भेट घेतल्यामुळे शिवसेनेतील गटबाजी अधाेरेखित झाली अाहे. अागामी निवडणुकीच्यापार्श्वभुमीवर संजय राऊत गट नाशिकमध्ये सक्रीय झाला की काय असा प्रश्न अाहे.

गुरूवारी माताेश्रीवर प्रवेशासाठी गर्दी : दरम्यानगुरूवारी शहरातील राष्ट्रवादी काॅंग्रेसचे दाेन माजी नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार असून त्यांच्यासह जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्यापार्श्वभुमीवर अाजी-माजी सभापती तसेच काही सदस्यही शिवसेनेत दाखल हाेणार अाहे. त्यामुळे गुरूवारी हाेणाऱ्या शिवसेनेतील प्रवेशाकडे सर्वांचे लक्ष लागून अाहेत.

गुरुवारी 'माताेश्री'वर प्रवेशासाठी गर्दी
गुरुवारी(दि. ६) शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे दाेन माजी नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार असून त्यांच्यासह जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अाजी-माजी सभापती काही सदस्यही शिवसेनेत दाखल हाेणार अाहेत.

छायाचित्रात मुदलियार यांच्यासमवेत संजय राऊत दिसत असून, या भेटीमागे त्यांचाच संबंध असल्याचे बाेलले जाते. नाशिकचे संपर्कप्रमुख अजय चाैधरी महानगरप्रमुख अजय बाेरस्ते अाहेत. त्यामुळे मुदलियार यांच्यासमवेत उभय पदाधिकारी असणे अपेक्षित हाेते; मात्र या दाेघांना डावलून थेट राऊत यांच्या माध्यमातून मुदलियार यांनी ठाकरे यांच्याशी भेट घेतल्यामुळे शिवसेनेतील गटबाजी अधाेरेखित झाली अाहे. अागामी निवडणुकीसाठी राऊत गट नाशिकमध्ये सक्रिय झाला की काय, असा प्रश्न अाहे.
बातम्या आणखी आहेत...