आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kajhigadhi People Issue At Nashik, Divya Marathi

काझीगढीचे रहिवासी सहा महिन्यांनंतरही रस्त्यावरच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सहा महिन्यांपूर्वी काझीगढीचा काही भाग कोसळल्यापासून येथील 25 कुटुंबे रस्त्यावर आली आहेत. या कुटुंबांना प्रशासनाकडून पर्यायी जागा देण्यात यावी, अशी मागणी स्थानिक नगरसेवक व परिसरातील नागरिकांकडून वारंवार केली जात असतानाही प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे तेव्हापासून येथील रहिवाशांचा संसार रस्त्यावरच असून, सहा महिन्यांत दोन वेळा गढी ढासळल्याने त्यात आणखी भर पडली आहे.

गेल्या नोव्हेंबरमध्ये झालेल्या दुर्घटनेनंतर पुन्हा दुर्घटना घडून तीन कुटुंबे रस्त्यावर आली. मात्र, तरीही प्रशासनाकडून हलगर्जीपणा होत आहे. भविष्यात पुन्हा मोठी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण, असा सवाल स्थानिकांनी केला आहे. विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काझीगढीची भिंत बांधण्यावर राजकारण होत असल्याचे समजते.

यांना बसलाय फटका : येथील चमेलीबाई परदेशी, बाळू जाधव, भाऊसाहेब जाधव, राधाबाई रणशिंगे, गायत्री तारू, किरण गुरव, उषा खाडे, दशरथ कदम, मनीषा जाधव, सुलोचना बिडवे, विश्वनाथ वारे, रंजनाबाई काथवटे, रुक्मिणी अंधारे, शोभा कुटे, सुरेश कुमावत, पांडुरंग जगताप, दशरथ शेटे, दिगंबर जाधव, छाया शेजवळ, सुरेश भावसार, जहूर मोईनुद्दीन मनियार, विपुल खोडके, राजेंद्र निकुंभ, मारुती सोळसे यांची घरे संसारोपयोगी साहित्यासह उद्ध्वस्त झाली आहेत.