आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कलानिकेतनतर्फे चित्र-शिल्प महोत्सव

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - नाशिक कलानिकेतनच्या 69 व्या कला महोत्सवाचे उद्घाटन 1 फेब्रुवारी रोजी कुसुमाग्रज स्मारक सभागृह येथे सायंकाळी 6 वाजता होणार आहे. यावर्षी चित्र-शिल्प महोत्सव अशी या महोत्सवाची संकल्पना आहे. 1 ते 5 फेब्रुवारीदरम्यान चालणा-या या महोत्सवामध्ये नाशिककरांना वेगवेगळ्या राज्यांची कला अनुभवायास मिळणार आहे.
महाराष्ट्राबरोबरच गोवा, कर्नाटक, ओरिसा, सावंतवाडी, राजस्थान आदी ठिकाणाहून या महोत्सवात कलाकार सहभाग घेणार आहेत. यात लाकडी खेळणी, बांबूकाम, कशिदा आदी त्या-त्या प्रांतांच्या कलांचे प्रात्यक्षिक कलाकार दाखविणार आहेत. या महोत्सवाच्या उद्घाटनास अ‍ॅड. विलास लोणारी, विजय संकलेचा, ज्येष्ठ चित्रकार सुहास बहुलकर, आमदार वसंत गिते आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी परंपरेनुसार ज्येष्ठ चित्रकार एस. एस. शेख यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
28 व 29 जानेवारी - रोजी कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी पोट्रेट व लॅँडस्केप स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
2 फेब्रुवारी - सुहास बहुलकर यांचे प्रात्यक्षिक व स्लाइड शो
3 फेब्रुवारी - शिल्पकार सुरेश भोईर यांचे प्रात्यक्षिक. कला महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी पर्यावरण या विषयावर आधारित चित्रकला, पोस्टर स्पर्धा
4 फेब्रुवारी - सांगलीचे चित्रकार सत्यजित वरेकर यांचे प्रात्यक्षिक
5 फेब्रुवारी - नाशिकमधील प्रथितयश चित्रकारांशी संवाद