आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कलानिकेतन रंगवणार वार्षिक कला प्रदर्शन

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - नाशिककरांना येत्या रविवारी (दि. 3) देशभरातील चित्रकारांच्या कुंचल्यांची जादू अनुभवायास मिळणार आहे. नाशिक कलानिकेतनच्या वतीने कुसुमाग्रज स्मारकात 3 फेब्रुवारी ते 7 फेब्रुवारी चित्र व शिल्प प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

उद्घाटनप्रसंगी सायंकाळी 5.30 वाजता कोल्हापूरचे ज्येष्ठ चित्रकार जयसिंगराव दळवी यांचा सत्कार करण्यात येणार आहे. या वेळी आमदार वसंत गिते, मनसे सरचिटणीस अतुल चांडक, राज्य चित्र व शिल्प निरीक्षक दिलीप बोरले उपस्थित राहणार आहेत. प्रदर्शनात भारतातील ज्येष्ठ चित्रकार, व्यावसायिक चित्रकार, विद्यार्थी यांची चित्रे व शिल्पे समाविष्ट असणार आहेत. सोमवारी (दि. 4) प्रसिद्ध चित्रकार प्रा. जी. एस. माजगावकर यांचे क्रिएटिव्ह निसर्गचित्र प्रात्यक्षिक व स्लाइड शो दाखविण्यात येणार आहे. तसेच मंगळवारी (दि. 5) चित्रकार प्रा. संजय काशीनाथ साबळे यांचे जलरंग व्यक्तिचित्र प्रात्यक्षिक व चित्रकार प्रा. दीपक वर्मा यांचे रचनाचित्र प्रात्यक्षिक होणार आहे. याशिवाय बुधवारी (दि. 6) चित्रकार संदीप लोंढे यांचे व्यक्तिशिल्प प्रात्यक्षिक व चित्रकार अशोक ढिवरे यांचा स्लाइड शो होणार आहे. चित्रकार कैलास ह्याळीज यांचे गुरुवारी रचनाचित्र प्रात्यक्षिक रंगणार आहे.

वृद्ध व उपेक्षित चित्रकाराचा होणार सत्कार

गेल्या सात वर्षांच्या काळामध्ये महाराष्ट्रभरातील विपन्नावस्थेत असलेल्या उपेक्षित वयोवृद्ध चित्रकारांचा शोध घेऊन त्यांची स्वतंत्र यादी नाशिक कलानिकेतनने तयार केली आहे. दरवर्षी यातील एका चित्रकाराचा सत्कार करण्याचा उपक्रम आहे. दरवर्षी एका ज्येष्ठ चित्रकारास रोख रुपये 21 हजार देऊन सन्मानित करण्यात येते. यंदाचे वर्ष तिसरे वर्ष असून, जयसिंगराव दळवी या 92 वर्षीय ज्येष्ठ चित्रकाराचा सत्कार करण्यात येणार आहे.