आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kalaram House In The Area Disinherit Case Due To The Original

काळाराम मंदिर परिसरात बेवारस बॅगमुळे घबराट, ब्रिटिशकालीन बाॅम्बमुळे देवळालीत खळबळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकरोड - कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहर परिसरात सर्वत्र चोख सुरक्षा व्यवस्था असताना बुधवारी (दि. १२) सकाळी देवळाली कॅम्प येथील भाजी मार्केटजवळ ब्रिटिशकालीन बाॅम्ब सापडला. लष्करी हद्दीच्या परिसरात हा बाॅम्ब सापडल्याने खळबळ उडाली आहे. चार महिन्यांपूर्वीदेखील वालदेवी नदीवर समांतर पुलाच्या बांधकामासाठी खोदकाम करताना ब्रिटिशकालीन बाॅम्ब सापडला होता.

जिल्ह्यात प्रसदि्ध देवळाली कॅम्पच्या लेव्हिट मार्केटजवळील भाजी मार्केटमागे गाजरगवतात भाजीविक्रेत्याला गोल दगडासारखी वस्तू दिसली. पोलिस तपासणीत तो ब्रिटिशकालीन बाॅम्ब असल्याचे स्पष्ट झाले. लष्करी तज्ज्ञांच्या तपासणीत बाॅम्ब निकामी असल्याचे स्पष्ट झाल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. सापडलेला बाॅम्ब तपासणीनंतर लष्कराकडे सोपवण्यात आला.

विनोदकी निष्क्रियता
हद्दीतबाॅम्ब सापडल्यानंतर यंत्रणेला सतर्क करण्याऐवजी वरिष्ठ निरीक्षकांना विनोदाचा मोह झाला. सापडलेला बाॅम्ब घरी घेऊन जाणार, खाऊ घालणार आणि पूजा करणार असल्याचे त्यांनी विनोदाने सांगितले. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण सुरक्षा यंत्रणेची झोप उडालेली असताना निरीक्षकांच्या विनोदाचे आश्चर्य वाटत आहे.

पोलिसांना दिली माहिती
भाजीमार्केटभागात गवतात गोल दगडासारखी वस्तू दिसल्याने संशय आला. तत्काळ पोलिस ठाण्यात जाऊन माहिती दिली. सतीशशिरसाठ, प्रत्यक्षदर्शी

बॉम्ब लष्कराच्या ताब्यात
भाजीमार्केटजवळील ब्रिटिशकालीन बाॅम्ब तपासणीनंतर लष्कराच्या ताब्यात देण्यात आला. - राजेशआखाडे, वरिष्ठ निरीक्षक, देवळाली कॅम्प पोलिस ठाणे
नाशिक | सिंहस्थाच्यापार्श्वभूमीवर हाय अलर्ट असताना बॉम्बशोध पथकाकडून शहरात ठिकठिकाणी तपासणी सुरू असतानाच बुधवारी पंचवटीतील काळाराम मंदिर परिसरात बेवारस बॅग आढळल्याने बॉम्बची अफवा पसरल्यानंतर परिसरात घबराट पसरली होती. दरम्यान, तासाभरानंतर बॅगेत बॉम्ब नसल्याचे बॉम्बशोध पथकाकडून सांगण्यात आले.

दुपारच्या सुमारास ही बेवारस बॅग सापडल्यानंतर शहरात बॉम्बची अफवा पसरली. या परिसरातील घटनेची माहिती मिळताच बॉम्बशोध पथक घटनास्थळी बॅगेच्या तपासणीसाठी दाखल झाले. या बॅगेची संपूर्ण तपासणी पथकाकडून करण्यात आल्यानंतर बॅगेत बॉम्ब नसल्याचे सांगण्यात आले. या घटनेनंतर पोलिस प्रशासनाकडून सतर्कता म्हणून शहरातील विविध ठिकाणी विशेष मोहीम राबवून बॉम्बशोध पथकाच्या मदतीने तपासणी करण्यात आली, तर शहरातील वडाळागाव, इंदिरानगर पंचवटी भागात कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. साधुग्राम परिसरातही कसून तपासणी करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत जेहान सर्कल, द्वारका, तपोवन इतर महत्त्वाच्या ठिकाणांची तपासणी बॉम्बशोध पथकाकडून सुरू होती.