आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्‍यमंत्र्यांनी फेसबुकवरून केली गोदामाईची पूजा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सिंहस्थकुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्याचे छायाचित्रे आणि या सोहळ्यादरम्यान घेतलेल्या सेल्फी अनेकांनी आपल्या फेसबुकच्या वॉलवर मंगळवारी पोस्ट केल्यात. याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील अपवाद ठरले नाहीत. त्यांनी विधानसभा अधिवेशनाच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत फेसबुक अपडेट केले. गोदावरी पूजनाच्या समयी केलेल्या संकल्पाचाही उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केला आहे.
सोशल मीडियाची जादू आता सर्वदूर पसरली आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यातही या मीडियाचीच हवा असेल याची प्रचिती ध्वजारोहण समारंभावरून आली. समारंभाप्रसंगी काढण्यात आलेले छायाचित्रे बहुतांश नेटसॅव्हींनी आपल्या फेसबुकच्या वॉलवर पोस्ट केले. मुख्यमंत्र्यांनीही नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे झालेल्या गोदावरी पूजनाचे फोटो फेसबुकच्या पेजवर अपलोड केले. इतकेच नाही तर पूजनासमयी त्यांनी कोणता संकल्प सोडला याचीही माहिती मराठी आणि इंग्रजी भाषेत देण्यात आली आहे.
असा आहे मुख्यमंत्र्यांचा फेसबुकवरील संदेश
सिंहस्थकुंभमेळयाच्या पावन पर्वाला आजपासून प्रारंभ झाला. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे पूजन करून ध्वजारोहण केले. राज्यात चांगला पाऊस पडू दे आणि शेतक-यांना समृद्धी लाभू दे, अशी प्रार्थना केली. महाकुंभ हे पर्वच मुळी विश्वशांतीच्या प्रार्थनेसाठी आहे. वसुधैव कुटुंबकम् हे आपले अधिष्ठान आहे. चला आपण सारे मिळून हा महाकुंभ यशस्वी करू या आणि स्वच्छता राखून त्याला ख-या अर्थाने हरित कुंभ म्हणून लौकिक मिळवून देऊ या!