आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कर्मवीरांचे नातू कुणाल भाजप कार्यकारिणीवर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे खंदे सर्मथक कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नातू कुणाल गायकवाड यांची भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या सदस्यपदी निवड झाली आहे. नाशिकच्या ऐतिहासिक र्शी काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहाचे नेतृत्व दादासाहेबांनी अत्यंत कुशलतेने केले होते. नाशिक लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्वही केले. डॉ. बाबासाहेबांच्या पश्चात आरपीआयच्या स्थापनेतही ते अग्रणी होते. असा वारसा लाभलेले दादासाहेबांचे नातू कुणाल यांना भाजपने आता थेट आपल्या प्रदेश कार्यकारिणीवर स्थान दिले आहे. वैमानिक असलेल्या कुणाल यांच्याकडे शहर उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी होती. रमाबाई वसतिगृह, दादासाहेब गायकवाड मैत्रेय संघ, विद्यार्थी मंचसह विविध सेवा संस्थांबरोबरच भाजपच्या माध्यमातून त्यांचे कार्य पंधरा वर्षांपासून सुरू आहे. वंचित घटकातील मुलांसाठी उच्च व तांत्रिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्याचा मानस त्यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केला.