आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘काेकणच्या राजा’ला कर्नाटकी हापूस भारी, कानडी अांब्याचा परिणाम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - ‘अांब्यात अांबा हापूस, सावरीचा सुंदर कापूस’ अशी अाेळख असलेला काेकणातील मधुर हापूस अांबा यंदा निर्यातीच्या बाबतीत अडचणीत अाला अाहे. बंगळुरूच्या कर्नाटकी हापूसने यंदा स्वस्ताईला कवटाळल्याने काेकणच्या राजाचा परदेशातील दिमाख कमी झाला अाहे. परिणामी कोकणातून हापूसची निर्यात घटली आहे. बदलत्या हवामानामुळे घटलेले उत्पादनाचा फटका बसत असतानाच निर्यातीच्या बाबतीतही यंदा काेकणच्या अांब्याचे नशीब रुसले आहे. असे असले तरी सर्वसामान्यांना मात्र ताे पुरेशा प्रमाणात उपलब्ध हाेईल.

या संदर्भात अांबा निर्यातदार अशाेक हांडे यांनी सांगितले, हापूसचे उत्पादनच कमी असल्याने, आहे तो आंबा जास्तीत जास्त परदेशात पाठविण्यावर आंबा उत्पादकांचा भर आहे. त्यामुळे किमान तोटा तरी भरून काढता येईल, ही अपेक्षा आहे. परंतु, या अपेक्षेवर बंगळुरू हापूसने पाणी फिरवले अाहे. अांब्याची सर्वाधिक निर्यात दुबईत हाेते. येथे काेकणातील हापूसचे दर १५० ते २०० रुपये किलाे असताना बंगळुरूचा अांबा किलोमागे ५० ते १०० रुपये दराने विकला जात अाहे. त्यामुळे निर्यातदारांचा कल बंगळुरूकडे अाहे. येथे हापूसचे पीक काेकणाच्या तुलनेने तसे नव्यानेच घेतले जात अाहे. त्यामुळे या अांब्यावर डाग नसतात. त्याची स्वच्छता अाणि नेटकेपणा परदेशी अांबाशाैकिनांना भुरळ घालत असल्याने काेकणच्या राजाचा दरारा काहीसा अाेसरला अाहे.

लांजा (जि. रत्नागिरी) येथील हापूस उत्पादक मुजीब कालसीकर म्हणाले, हापूसचा खरा हंगाम एप्रिलच्या मध्यानंतर सुरू होणार असून तो जून मध्यापर्यंत राहील. विशेष म्हणजे कोकणात सध्या काही हापूस आंब्यांना मोहोर येत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. केळशीचे अांबा उत्पादक डाॅ. विश्वास केळकर यांनी सांगितले, बदलत्या हवामानामुळे हापूसचा मोहोर, फलधारणा, फळांची वाढ यावर परिणाम दिसून येत आहे. गेल्या वर्षी काेकणात अपेक्षेपेक्षा कमी पाऊस झाला. थंडीतही अनियमितता असल्याने पहिला माेहोर जळाला. दुसऱ्या माेहोराला अालेला अांबा तुलनेने कमी आहे. त्यामुळे यंदा अांब्याची अावक कमी राहील.

पुढील स्लाइडवर वाचा, कोकण हापूस हाँगकाँगला...
बातम्या आणखी आहेत...