आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कसबे सुकेणेत पारा ३.२ अंशांवर, पुदिन्यावर बर्फ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- नाशिक जिल्ह्यातील कसबे सुकेणे येथे बुधवारी पहाटे पारा ३.२ वर घसरला. २०११ नंतर प्रथमच या भागांत अशा नीचांकी तापमानाची नोंद झाली. या थंडीमुळे निफाड तालुक्यातील बाणगंगा नदीच्या खोऱ्यात भंडारे वस्ती भागात पुदिन्याच्या पानांवर दवबिंदू अक्षरश: गोठले होते.

कसबे सुकेणे भागातही वेगवेगळ्या तापमानाची नोंद झाली आहे. नानासाहेब भंडारे यांच्या शेतात ३.२, तर द्राक्ष संशोधक वासुदेव काठे यांच्या शेतात ६ अंश तापमान नोंदले गेले. निफाडच्या कुंदेवाडी येथे ५ अंश तपमानाची नोंद झाली. बारमाही सिंचन क्षेत्र म्हणून हा भाग ओळखला जातो.