आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कश्यपी धरणात बुडून ओझरच्या तरुणाचा मृत्यू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - कश्यपीधरणावर फिरायला गेलेल्या ओझर मिग येथील चार मित्रांपैकी विक्रांत हिरे (वय ४०) याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास घडली. पोलिसांनी गावकऱ्यांच्या मदतीने रात्री ७.४५च्या सुमारास मृतदेह पाण्याबाहेर काढला. हरसूल पोलिस ठाण्यात याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

कश्यपी धरणात बुडून ओझरच्या तरुणाचा मृत्यू
आेझरमिग परिसरातील चार मित्र कश्यपी धरण परिसरात बुधवारी फिरायला आले होते. त्यातील विक्रांत हिरे हा पोहण्यासाठी पाण्यात उतरला. पाण्यात असलेल्या टेकडीवर जाऊन तो बसला तेथून पुन्हा पोहून काठाकडे येत असताना पाण्यात बुडाला मरण पावला. पोहताना धाप लागल्यामुळे तो बुडाला असावा, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. ही घटना कळताच गावकऱ्यांनी मदतीसाठी धाव घेतली. पोलिसांनाही कळविण्यात आले, त्यांनी काही नागरिकांच्या साहाय्याने दोन तासांच्या प्रयत्नांनंतर हिरे यांचा मृतदेह बाहेर काढला.