आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kath Lab In Vijan Hospital At Nashik, Divya Marathi

नाशिकमध्ये आता अत्याधुनिक कॅथलॅब!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- जगातील पहिली अत्याधुनिक समजली जाणारी सिमेन्स कंपनीची ‘आर्टिस-वन’ कॅथलॅब नाशिकमध्ये कार्यान्वित झाली आहे. विजन हॉस्पिटल अँण्ड रिसर्च सेंटरला या लॅबचा सन्मान मिळाला असून, नाशिकनंतरच ती युरोपियन देश आणि अमेरिकेसारख्या प्रगत देशांत आणि त्यानंतर जगभरात कंपनी पोहोचविणार आहे. यामुळे हृदयरोगाच्या संदर्भातील चाचण्यांचे अचूक निदान आता शहरातच शक्य झाले असून, मुंबई-पुण्यातही नाही अशी वैद्यकीय सेवा शहरवासीयांना उपलब्ध होणार असल्याचे हॉस्पिटलचे संचालक प्रसिद्ध हृदयरोग सर्जन डॉ. विनोद विजन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

विजन कार्डिअँक अँण्ड क्रिटिकल केअर सेंटर हृदयरोग चिकित्सा क्षेत्रात कार्यरत असून, 1 मे रोजी सार्ज‍या होत असलेल्या 27व्या वर्धापनदिनाच्या औचित्यावर अत्याधुनिक वैद्यकीय सेवा सुविधांनी परिपूर्ण असलेल्या विजन हॉस्पिटल अँण्ड रिसर्च सेंटरची सुरुवात करण्यात आली आहे. त्याचाच भाग

म्हणून ही अत्याधुनिक कॅथलॅब सुरू करण्यात आली आहे.
या लॅबची वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी डोसचे रेडिएशन आणि अतिसुस्पष्टता ज्यामुळे लवकर व अचूक निदान करणे शक्य होते. याशिवाय, अतिआधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उभारलेले दोन ऑपरेशन थिएटर्स, सर्जिकल व कार्डिअँक आयसीसीयू, हिमोडायलिसीस सीआरआरटी अशा सुविधाही या सेंटरमध्ये उपलब्ध असल्याचा लाभ रुग्णांना मिळणार असून, सोमवारपासून हे नवे हॉस्पिटल रुग्णसेवेत कार्यरत होणार असल्याचे डॉ. विजय विजन यांनी सांगितले.