आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कविता राऊत होणार ‘महाराष्ट्र आयकॉन’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- प्रख्यात धावपटू कविता राऊत हिच्या आतापर्यंतच्या देदीप्यमान कामगिरीला सलाम करण्यासाठी तिला एका संस्थेतर्फे ‘महाराष्ट्र आयकॉन’ पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. 25 मार्चला हा सोहळा मुंबईत होणार असून, तिला या पुरस्काराबाबतचे पत्र नुकतेच प्राप्त झाले आहे. कविता सध्या सरावासाठी बंगलोरला असल्याने तिला या संस्थेकडून बंगलोर ते मुंबई जाण्यायेण्यासाठीच्या विमानसेवेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दिल्या जाणार्‍या या पुरस्काराचे स्वरूप सन्मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे आहे.

हा सन्मान प्रियच.
मी कुठेही असले तरी महाराष्ट्रात होणारा गौरव प्रिय असतो. पुरस्कार स्वीकारायला मुंबईला जाईल.
-कविता राऊत, धावपटू