आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘केबीसी’चा प्रमुख चव्हाणला अटक, मुंबईत अावळल्या नाशिक पाेलिसांनी मुसक्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - केबीसी कंपनीच्या माध्यमातून अल्पावधीत दामदुप्पट रक्कम देण्याचे अामिष दाखवून राज्यभरातील लाखाे गुंतवणूकदारांची सुमारे ४५० कोटींपेक्षा जास्त रकमेची फसवणूक करून परदेशात पळून गेलेला मुख्य सूत्रधार भाऊसाहेब छबू चव्हाण पत्नी आरती यांना मुंबईच्या अांतरराष्ट्रीय विमानतळावर सीबीआय, इमिग्रेशन विभाग आणि नाशिकच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने अटक केली. शुक्रवारी (दि. ६) सकाळी ६.३० वाजता ही कारवाई करण्यात आली. फसवणुकीच्या गुन्ह्यात अाराेपीला अटक करण्याची अशा प्रकारची ही देशातील पहिलीच सर्वात मोठी कारवाई असल्याचे मानले जात अाहे.

चव्हाण दाम्पत्याच्या विरोधात सीबीआयने रेडकॉर्नर नोटीस बजावल्याने इंटरपोलच्या माध्यमातून त्यांचा शोध सुरू होता. दोनच दिवसांपूर्वी पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांना इंटरपोलकडून भाऊसाहेब चव्हाण भारतात येणार असल्याची माहिती समजली हाेती. त्याअाधारेच त्यांनी सतत संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांशी संपर्कात राहून या कारवाईला अंतिम रूप दिले. त्यामुळेच चव्हाणला पत्नीसह ताब्यात घेण्यात
नाशिक पोलिसांना यश अाले. वर्षभरापासून या गुन्ह्याचा तपास करणाऱ्या सीअायडीकडूनच नाशिक पाेलिसांकडे दाेन दिवसांपूर्वीच हा गुन्हा वर्ग करण्यात अाला हाेता, हे विशेष! केबीसीच्या माध्यमातून राज्यातील लाखो गुंतवणूकदारांना वेगवेगळ्या याेजनांद्वारे वर्षभरात दामदुप्पट पैसे देण्यासह विविध लाभ देण्याचे अामिष दाखवून काेट्यवधींची माया चव्हाण दाम्पत्याने जमा केली हाेती. अाैरंंगाबाद, जालन्यापासून सुरुवात करीत राज्यभरात एजंटमार्फत जाळे विणले. अालिशान कारमधून फिरणाऱ्या चव्हाण याने एजंट्सना दुचाकी उपलब्ध करून दिल्याने त्याकडेे शेकडाे तरुण अाकर्षित झाले. नाशकात या याेजनेचा भांडाफाेड हाेण्याच्या भीतीने इतरत्र एजंट वाढविण्यात अाले. नाशिकसह स्थानिक भागात मात्र त्याच्या विस्ताराकडे दुर्लक्ष करण्यात अाले. महामार्गावरील हाॅटेल जत्रा शेजारीच माेठे कार्यालय उभारण्यात अाले. तेथूनच दरराेज काेट्यवधींच्या रकमा जमा केल्या जात हाेत्या. वर्षभरात काेट्यवधींच्या गुंतवणुका मिळविणाऱ्या एजंटला बैठकांच्या नावाखाली थेट सिंगापूरमध्ये क्रूझवारी घडवून अाणली जात हाेती. हे सगळे सुरू असतानाच काही गुंतवणूकदारांना ठेवींच्या मुदती पूर्ण हाेऊनही रकमा परत मिळत नसल्याने खळबळ उडाली. हा सर्व प्रकार तत्कालीन पाेलिस अायुक्त कुलवंतकुमार सरंगल सहायक अायुक्त पंकज डहाणे, वरिष्ठ निरीक्षक अनिल पवार यांना समजताच त्यांनी स्वत:हून पुढाकार घेत (सुमाेटाे) केबीसीच्या कार्यालयावर जुलै २०१४ मध्ये छापा टाकला. तेथूनच हा घाेटाळा उघडकीस अाला. ताेपर्यंत मात्र मुख्य सूत्रधार भाऊसाहेब चव्हाण त्याच्या पत्नीने सिंगापूरला पलायन केले हाेते. या फसवणूकप्रकरणी एकनाथ दत्तात्रय खैरनार (रा. चांदवड) यांनी प्रथम आडगाव पोलिस ठाण्यात तक्रार देताच शेकडाेंच्या संख्येने गुंतवणूकदार पुढे अाले. या प्रकरणी नाशिकसह राज्यभरातील सहा हजारांहून अधिक गुंतवणूकदारांची सुमारे ४४० कोटींची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले. आडगाव पोलिसांनी या गुन्ह्यात भाऊसाहेब चव्हाणला मदत करणाऱ्या कंपनीचे संचालक त्याचा भाऊ बापूसाहेब चव्हाण, साधना चव्हाण, व्यवस्थापक पंकज शिंदे, चालक नितीन शिंदे, त्याचा साडू निलंबित पोलिस कर्मचारी संजय जगताप, कौशल्या जगताप, भारती शिलेदार यांना अटक केली हाेती. भाऊसाहेब चव्हाण आणि नातेवाइकांचे बंगले, चांदवडसह इतरत्र असलेले भूखंड, शेतजमीन अशी ८० काेटींची मालमत्ता आणि सुमारे ७० लाखांची वाहने पोलिसांनी या प्रकरणी अातापर्यंत जप्त केलेली अाहेत.

अार्थिक नाकेबंदीमुळेच मायदेशी रवाना
चार दिवसांपूर्वीच मिळाली हाेती माहिती
चव्हाण वरिसंगापूरमध्ये अाठ दिवसांपासून पाळत ठेवण्यात अाली हाेती. रेडकाॅर्नर नाेटीस बजाविण्यात अालेली असल्याने त्याने सिंगापूर एअरलाइन्सकडे तिकीट बुक करताच बाेर्डिंग पास तयार हाेतानाच पाेलिस अायुक्तांना माहिती मिळाली हाेती. याची माहिती भारतात मिळाल्याची शंका अाली असती तर त्याने प्रवास रद्द करण्याची शक्यता हाेती. त्यामुळे या दाम्पत्याने सिंगापूर विमानतळावर पाेहोचून पासपाेर्ट तपासला त्याचवेळी ताे भारतात परतणार असल्याची खात्री झाली अाणि पथक रवाना करण्यात अाले. रेडकाॅर्नरमुळे इतर कुठल्याही देशात जाता येत नसल्याने ताे भारतात परतला.

मायलेकीच्या अात्महत्येचाही गुन्हा
चव्हाणच्या विरोधात आडगाव, सरकारवाडा पोलिस ठाण्यात फसवणूक आणि भद्रकाली पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्याची नाेंद आहे. जिल्हा रुग्णालयातील परिचारिका पुष्पलता निकम यांचा मुलगा सागर निकम हा केबीसीचा एजंट हाेता. त्यानेही अनेक गुंतवणूकदारांच्या रकमा कंपनीत जमा केल्या हाेत्या. मात्र, चव्हाण याने पाेबारा केल्याने गुंतवणूकदारांनी त्यांच्याकडे पैशांसाठी तगादा लावल्याने मायलेकांनी विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची घटना घडली हाेती.

२०१२पासून रुजली राज्यभरात केबीसी कंपनीची पाळेमुळे
पंचवटीत हिरावाडी येथे राहणारा भाऊसाहेब चव्हाण केमिस्ट होता. २०१२ मध्ये मुलाच्या नावाने त्याने केबीसी ही कंपनी स्थापन केली. जिल्हा मध्यवर्ती बँकेत लिपिक असलेला बंधू बापूसाहेब चव्हाण याच्या माध्यमातून चांदवड तालुक्यात या याेजनेचा विस्तार करण्यात अाला. सुरुवातीला चांगला प्रतिसाद मिळताच कंपनीचा विस्तार वाढला. त्यासाठी राज्यभरात किमान दाेन ते तीन हजार एजंट नियुक्त करण्यात अाले हाेते.

चव्हाण दाम्पत्याविराेधात सीबीअायमार्फत सिंगापूर सरकारवर दबाव वाढत हाेता. त्यातच त्याच्या अार्थिक नाड्या अावळल्या गेल्याने त्याचवेळी दाेघांना शारीरिक व्याधीने बेजार केले हाेते. तर, कुटुंबीयातील सर्वच जवळचे नातेवाईक अटकेत असल्याने त्यांच्या मागे गुंतवणूकदारांचा ससेमिरा असल्याने भाऊसाहेब वैफल्यग्रस्त झाला हाेता. त्यातूनच ताे मायदेशी परत अाल्याची खुद्द पाेलिस वर्तुळात चर्चा सुरू अाहे.

अशी झाली कारवाई
आयुक्तएस. जगन्नाथन यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यरात्री पथक मुंबई विमानतळावर रवाना झाले. सिंगापूरहून रात्री एकला निघालेली फ्लाइट मुंबईत पहाटे येणार असल्याचे कळले. िवमानातून भाऊसाहेब पत्नीसह बाहेर पडत असताना इमिग्रेशनच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले. सीबीआय, इंटरपोल आणि आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटकेची कारवाई पूर्ण केली. सहायक आयुक्त सचिन गोरे, निरीक्षक विजय पन्हाळे, हेमंत सावंत आणि आर्थिक गुन्हे शाखेच्या सात कर्मचाऱ्यांच्या पथकाने पुढील प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारास चव्हाण दाम्पत्यास नाशकात अाणण्यात अाले.

शनिवारी न्यायालयात हजर करणार
^चव्हाणयाच्या अटकेमुळे गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळण्याच्या अाशा पल्लवित झाल्या अाहेत. महाराष्ट्र ठेवीदार हितसंरक्षण कायद्यान्वये चव्हाण याच्या इतर मालमत्तांचा शाेध घेऊन त्याच्या लिलावाची परवानगी न्यायालयाकडे मागितली जाईल. या दाम्पत्यास शनिवारी न्यायालयात हजर केले जाणार अाहे. -राजेंद्र घुमरे, जिल्हासरकारी वकील

रेडकाॅर्नर नाेटीस ठरली कारणीभूत
^चव्हाण दाम्पत्य सिंगापूरमध्ये असल्यामुळे त्यांच्या अटकेसाठी न्यायालयाकडे अाॅगस्ट २०१४ मध्येच लूकअाउट नाेटीस, तसेच सीबीअायमार्फत इंटरपाेलकडून अांतरराष्ट्रीय रेड काॅर्नर नाेटीस सिंगापूर सरकारला बजावण्यात अाली. त्यानंतर केंद्र सरकारकडून सिंगापूर सरकारवर दबाव अाणला गेल्यानेच त्याला मायदेशी परतावे लागले. - अॅड. पंकज चंद्रकाेर, सहायकसरकारी वकील
इंटरपाेलचा अनुभव उपयुक्त
पाेलिस अायुक्त एस. जगन्नाथन जून २०१० ते जुलै २०१४ या कालावधीत फ्रान्स येथील इंटरपाेलच्या मुख्यालयात सीबीअायशी संलग्न शाखेत संचालकपदी कार्यरत हाेते. हा अनुभव अाणि इंटरपाेलमधील अाेळखींमुळे चव्हाण यास अटक करण्यात माेलाची भूमिका त्यांनी बजावली.

गुंतवणूकदारांचे पैसे देण्याचा प्रयत्न
^भाऊसाहेब चव्हाणयाच्यािवराेधात २१० कोटींच्या फसवणुकीचे विविध गुन्हे अाहेत. त्याच्या देशातील मालमत्ता, तसेच सिंगापूर येथील मालमत्ता, बँक लॉकरही जप्त करून गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याचा प्रयत्न हाेईल. - एस. जगन्नाथन, पाेलिसअायुक्त

चव्हाण दाम्पत्याची मुले सिंगापूरमध्येच
चव्हाण यांची दोन मुले कृष्णा (१७) आणि ज्ञानेश्वर (१९) सिंगापूरमध्येच शिक्षण घेत आहेत. त्यातील कृष्णा भाऊसाहेब चव्हाण याच्या अाद्याक्षरांच्या नावानेच (केबीसी) कंपनीची स्थापना करण्यात अाली आहे. या दाेन्ही मुलांच्या नावावरदेखील मालमत्ता असल्यानेे चाैकशीसाठी अावश्यकता भासल्यास त्यांनाही भारतात अाणले जाईल, असे पाेलिसांनी सांगितले.
केबीसी घाेटाळ्यातील मुख्य संशयित चव्हाण दाम्पत्यास ताब्यात घेताना पोलिस.
बातम्या आणखी आहेत...