आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘केबीसी’च्या मुख्य प्रवर्तक भाऊसाहेब चव्हाणांचा राजस्थान पाेलिस घेणार ताबा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक : अल्पावधीत दामदुप्पट करून देण्याबराेबरच सिंगापूरवारी घडवून अाणण्याचे अामिष दाखवित काेट्यवधींना गंडा घातल्याप्रकरणी कारागृहात असलेल्या केबीसीचा मुख्य प्रवर्तक भाऊसाहेब चव्हाण याचा राजस्थान पाेलिस ताबा घेणार अाहे. चव्हाण याने कंपनीच्या माध्यमातून राजस्थानमध्येही शेकडाे गुंतवणूकदारांना गंडा घातल्याचे समाेर अाले अाहे. या गुन्ह्यात तपासासाठी राजस्थानमधील पाली जिल्हा पाेलिस नाशकात दाखल झाले अाहेत. 
 
केबीसी मल्टिट्रेड कंपनीमार्फत महाराष्ट्रातील हजारो गुंतवणूकदारांना अल्पदरात जादा परताव्याचे आमिष दाखवून कोट्यवधींची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस अाला हाेता. तत्कालीन पाेलिस अायुक्त एस. जगन्नाथन यांनी सखाेल तपासावर त्याची सिंगापूरमधील अार्थिक नाकेबंदी केल्याने त्यास भारतात परतण्यास प्रवृत्त केले हाेते. 
 
त्यापाठाेपाठ मुंबई विमानतळावरच चव्हाण दाम्पत्यास पाेलिसांनी अटक केली. चव्हाण याच्याकडील सुमारे २०० काेटींची मालमत्ता पाेलिसांनी जप्त केली असून तपासाची प्रक्रिया सुरूच अाहे. देशभरातील लाखाे गुंतवणूकदार त्याच्याविराेधात पुढे अाले अाहे. पाचशे काेटींहून अधिक फसवणूक झाल्याचा संशय अाहे. 
 
चव्हाण विरोधात १३ गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यापाठाेपाठ राजस्थानमधील पाली जिल्ह्यातील सुजोदगढ या पोलिस ठाण्यातही चव्हाणविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चव्हाण नाशिक कारागृहात असल्याची माहिती मिळताच राजस्थान पााेलिसांनी ताबा घेण्यासाठी शहरात तळ ठोकला आहे. त्यांनी जिल्हा न्यायालयाकडे अर्ज दाखल केला असता न्यायालयानेही चव्हाण याचा ताबा त्यांच्याकडे साेपविण्याचे अादेश दिले अाहेत. त्यानुसार कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करीत बुधवारी (दि. १०) त्यास राजस्थान पाेलिस ताब्यात घेण्याची शक्यता अाहे. 
 
अारती चव्हाणच्या अर्जावर १६ ला सुनावणी 
भाऊसाहेबचव्हाण याची पत्नी अारती चव्हाण ही कारागृहात असून, त्यांनी वैद्यकीय कारणास्तव जामिनासाठी न्यायालयात अर्ज सादर केला अाहे. या अर्जावर १६ तारखेला सुनावणी ठेवण्यात अाली अाहे. पाेलिसांनी मात्र, संशयित चव्हाण यांच्यावर शासकीय रुग्णालयात चव्हाण यांच्यावर उपचार करणे शक्य असल्याचे सांगत जामिनास विराेध दर्शविला अाहे.