आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाेलिस सोनवणेच्या कोठडीत दाेन दिवस वाढ, ‘केबीसी’च्या मुख्य सूत्रधाराचा उजवा हात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - केबीसी कंपनीचा मुख्य सूत्रधार भाऊसाहेब चव्हाण याचा उजवा हात समजला जाणारा पोलिस कर्मचारी रमेश सोनवणे त्याची पत्नी शोभा या दोघांना न्यायालयाने अाणखी दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. सोमवारी (दि. ३) संशयितांची सहा दिवसांची पोलिस कोठडीची मुदत संपली असता त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते.
चव्हाणच्या अनुपस्थितीत कंपनीचे आर्थिक व्यवहार साेनवणे सांभाळत असल्याने त्याच्यावर सुरुवातीपासून संशय होता. त्याच्या सर्व बँक व्यवहारांची गोपनीय तपासणी सुरू होती. दोन दिवसांपूर्वीच एका बँक खात्यातून साडेचार लाखांची रक्कम पत्नी शोभा यांच्या खात्यात वर्ग झाल्याचे तपासणीत उघडकीस आले. याबाबत सोनवणे त्याच्या पत्नीची वेगवेगळी चौकशी केल्यानंतर दोघांच्या जबाबात तफावत अाढळल्याने दोघांना अटक करण्यात आली. संशयितांना सोमवारपर्यंत पोलिस कोठडी देण्यात अाली हाेते. ही मुदत संपल्यानंतर दोघांना न्यायालयात हजर केले होते. सरकार पक्षातर्फे अॅड. पंकज चंद्रकोर यांनी काम पाहिले.

कार जप्त
सोनवणेची व्हेरिटो कार (एमएच १५, डीएच ३१६०) जप्त करण्यात आली. केबीसी व्यवहारांची सर्व माहिती सोनवणेला असल्याने भाऊसाहेब चव्हाण याच्या जबाबानुसार सोनवणेची उलट तपासणी करण्यात येणार आहे. सोनवणेने नातेवाइकांच्या नावे घेतलेल्या कोट्यवधींच्या मालमत्तेची चौकशी हाेणार आहे.

सोनवणे निलंबित
सोनवणे लागेल्या सोमवारी अटक केल्यानंतर शासनाकडे निलंबनाचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. पोलिस उपआयुक्त (प्रशासन) यांनी त्याला २८ सप्टेंबर राेजी निलंबित केले.
बातम्या आणखी आहेत...