आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

केबीसीतील आरोपींची औरंगाबादेत चौकशी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सुमारे दोनशे कोटी रुपयांचा गंडा घालणार्‍या केबीसी घाेटाळ्यातील सहा आरोपींना नाशिकच्या न्यायालयाने औरंगाबाद पोलिसांकडे वर्ग केले आहे. नाशिकप्रमाणेच औरंगाबादमध्येही केबीसीचे संचालक भाऊसाहेब चव्हाण व त्याची पत्नी आरती चव्हाण यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल असून या दांपत्याने सिंगापूरला पलायन केले आहे.

दुप्पट पैशाचे आमिष दाखवून एजंटमार्फत चव्हाण दांपत्याने २०० कोटी रुपयांचा अपहार करून गुंतवणूकदारांची फसवणूक केली आहे. या घोटाळ्यामुळे राज्यभर खळबळ उडाली होती. फक्त नाशिकच नव्हे तर मराठवाडा भागातील नागरिकांची देखील मोठ्या प्रमाणात फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी नाशिक पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात फरार असलेल्या भाऊसाहेब चव्हाणचा भाऊ बापूसाहेब चव्हाण, साधना चव्हाण, संजय जगताप, पंकज शिंदे यांच्यासह चौघांना पोलिसांनी अटक केलेली आहे.

बुधवारी त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. आर. कदम यांनी त्यांना तपासकामी औरंगाबाद गुन्हे शाखेच्या ताब्यात देण्याचे आदेश दिले आहेत. सरकार पक्षातर्फे अ‍ॅड.पंकज चंद्रकोर यांनी युक्तिवाद केला.