आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्ज काढून केबीसीत 4 लाख गुंतवले; आत्महत्येचा प्रयत्न

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- केबीसीकडून फसवणूक झालेल्या खाद्यपदार्थ विक्रेत्याने विषारी औषध सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे उघड झाले आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, प्रकृती गंभीर असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.

सिडकोतील यशवंत व्यंकट बडगुजर यांनी कुटुंबीयांना न सांगता पतसंस्थेतून 4 लाखांचे कर्ज काढून केबीसीत गुंतवले होते. पैसे परत मिळण्याच्या विवंचनेत यशवंत यांनी हे पाऊल उचलल्याचे समजते. याआधी स्वत:चे 30 लाख गुंतवणार्‍या एजंटाने आईसह आत्महत्या केली होती.

दिवसात 600 तक्रारी : केबीसीविरुद्ध रविवारी सुमारे 600 जणांनी फसवणूक झाल्याची तक्रार आडगाव पोलिसांत दिली. तक्रारींची संख्या 3147 वर गेली असून फसवणुकीचा आकडा 110 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. यातक्रार अर्जाची पडताळणी करण्यात येत असून जबाब नोंदविण्यात येत असल्याचे पोलिसाानी सांगितले