आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘केबीसी’चा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे; राज्यभरातून सुमारे 5,400 तक्रार अर्ज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- कोट्यवधींच्या केबीसी फसवणूक प्रकरणाचा तपास आडगाव पोलिसांकडून आर्थिक गुन्हा शोध पथकाकडे वर्ग करण्यात आला असून त्यासाठी वरिष्ठ निरीक्षक, दोन सहायक निरीक्षक आणि पाच कर्मचार्‍यांचे पथक नियुक्त करण्यात आले आहे. दरम्यान, आडगाव पोलिसांनी बापूसाहेब चव्हाणच्या कोणार्कनगरच्या बंगल्यासह भाऊसाहेब चव्हाण याच्या चांदवड तालुक्यातील 45 एकर शेतजमिनीची कागदपत्रे हस्तगत केली आहेत.

राज्यभरातून सुमारे 5,400 तक्रार अर्ज आडगाव पोलिसांकडे आले असून, फसवणुकीचा आकडा 150 कोटींवर गेला आहे. वरिष्ठ निरीक्षक चांदखेडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाकडे संशयित व तक्रारअर्ज हस्तांतरित झाले. संशयितांचे बॅँक खाते, लॉकर बुधवारी तपासले जाणार आहे. चांदवड तालुक्यातील एकनाथ खैरनार यांच्या फिर्यादीनुसार 11 रोजी केबीसी संचालकांविरुद्ध पहिला गुन्हा दाखल झाला होता.
स्वतंत्र पथकामुळे तपासाला गती
० रिझर्व्ह बँक, सेबीकडून पथक प्रशिक्षित.
० फसवणुकीसह इतर कलमांन्वये कारवाईस मदत.
० एकाच गुन्ह्याचा तपास असल्याने वेगाने चक्रे फिरतील. आणखी आरोपींना अटक होऊ शकेल.
० आरोपींचा शोध, मालमत्तांचा तपास, न्यायालयीन काम, कागदपत्रांची जुळवाजुळव वेगाने होईल.