आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केबीसीचा सूत्रधार चव्हाणच्या वॉरंटसाठी न्यायालयात अर्ज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - कोट्यवधींच्या फसवणूकप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या आणि सिंगापूरमध्ये स्थायीक झालेल्या ‘केबीसी’ कंपनीचा मुख्य संचालक भाऊसाहेब चव्हाण व त्याची पत्नी आरती चव्हाण यांच्या अटकेसाठी रेडकॉर्नर नोटीस बजावण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. तत्पुर्वी चव्हाण दांम्पत्याच्या अटकेसाठी न्यायालयातून वॉरंट काढण्यासाठी पोलिसांनी दाखल केलेल्या अर्जावर बुधवारी निर्णय घेण्यात येणार आहे. तसेच चव्हाण कुटुंबियांसह अटकेत असलेल्या संशयितांच्या लॉकरची तपासणीच्या अर्जावरही निर्णय होणार आहे.

केबीसीचा मुख्य सुत्रधार भाऊसाहेब चव्हाण व त्याच्या कुटूंबियांनी वेगवेगळ्या योजनांमार्फत गुंतवणूकदारांना वर्षात दाम दुप्पट, दाम तिप्पटचे आमीष दाखवून गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. केबीसीच्या फसवणूकीची व्याप्ती 1 हजार कोटींपर्यंत पोहचली असून गुंतवणूकदारांची संख्या लाखावर आहे. यासंदर्भात, आर्थिक गुन्हा शोध पथकाकडून स्वतंत्र तपास केला जात असून परदेशात फरार झालेल्या चव्हाण दांपत्याच्या अटकेसाठी रेडकॉर्नर नोटीस बजावण्यात येणार आहे. यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या गृहखात्याकडे पाठपुरावा केला जात आहे.

चव्हाण दांपत्याच्या अटकेसाठी वॉरंट बजावण्याची परवानगी पोलिसांनी मंगळवारी जिल्हा न्यायालयाकडे मागण्यात आली. सरकारी वकील श्रीधर माने यांनी गुंतवणूकदारांची मोठय़ाप्रमाणात फसवणूक झाली असून संशयितांचे लॉकर उघडल्यास निश्चीत मालमत्तेचे कागदपत्रे, रोकड हाती लागेल, असा युक्तीवाद केला.

कायद्यातील तरतुदीप्रमाणे वॉरंटसाठी परवानगी मिळावी, अशी मागणीही केली. या दोन्ही अर्जावर न्यायालयाकडून बुधवारी निर्णय होण्याची शक्यता असल्यचोही माने यांनी सांगितले. चव्हाण दाम्पत्यावर कारवाई झाली तरही लाखो गुंतवणूकदारांचे झालेले नुकसान भरून निघण्याची शाश्वती नाही.

(फाईल फोटो : भाऊसाहेब चव्हाण)