आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केबीसी प्रकरणात कागदपत्रे सादर करण्यास न्यायालयाकडून मुदतवाढ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - केबीसी प्रकरणात कागदपत्रे सादर करण्यासाठी पोलिसांना न्यायालयाकडून मुदतवाढ देण्यात आली आहे. केबीसी संशयितांचे बॅँक लॉकर तपासाबाबत पोलिसांनी वेळेत माहिती सादर केली नसल्याने न्यायालयाकडून पोलिसांकडे विचारणा करण्यात आली.

केबीसीप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून तक्रारदारांचा ओघ सुरू असल्याने नेमका फसवणुकीचा आणि तक्रारदारांचा आकडा देण्यास पोलिसांनी वेळ मागितला आहे. मुख्य संशयित परदेशात असल्याने त्यास अटक करण्यासाठी प्रक्रिया सुरू असून या सर्व प्रक्रियेमध्ये वेळ लागण्याची शक्यता असल्याने तपासी अधिकार्‍यांकडून कागदपत्रे सादर करण्यासाठी वेळ मागण्यात आला होता. अटक करण्यात आलेल्या संशयितांच्या बॅँक लॉकरबाबत माहिती देण्यास विलंब झाल्याने न्यायालयाने पोलिसांवर ताशेरे ओढले.