आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • KBC Fraud News In Marathi, Divya Marathi, Police, Crime, Sanjay Jagtap

केबीसी फसवणूक प्रकरण: चव्हाणचे नातेवाईक पोलिसांच्या रडारवर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - केबीसी कंपनीशी संबंधित सर्व संचालक व नातेवाइकांची पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. बहुतांश नातेवाईक गावातून बाहेर गेले असल्याने त्यांना पकडण्यात पोलिसांना अडचण निर्माण होत आहे. दरम्यान, पोलिस कर्मचारी संजय जगतापची पत्नी कौशल्या जगताप हिला अटक करण्यात आली असून याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयितांची संख्या नऊ झाली आहे.

केबीसी कंपनीद्वारे फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांची संख्या वाढतच आहे. भाऊसाहेब चव्हाण व त्याच्या जवळच्या नातेवाइकांनी असंख्य नागरिकांना केबीसीच्या योजनांमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडले असल्याचे पोलिसांना प्राप्त झालेल्या तक्रारींमध्ये आढळून आले आहे. त्यामुळेच पोलिसांनी कौशल्या जगताप हिला अटक केली. शुक्रवारी भाऊसाहेब चव्हाणची मेहुणी भारती शिलेदार हिला राहता येथून अटक करण्यात आली होती. चव्हाण याच्या जवळच्या नातेवाइकांचा पोलिस शोध घेत आहेत. दरम्यान, आडगाव पोलिस ठाण्यात याप्रकरणी 2500 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये काही एजंटांच्या नावांच्या तक्रारी आहेत.

नातेवाइकांचा शोध
केबीसी कंपनीत कोट्यवधींची गुंतवणूक करण्यास भाग पाडणारे बापूसाहेब चव्हाण यांच्या जवळच्या नातेवाइकांचा पोलिस शोध घेत आहेत. दरम्यान, अशा फसव्या कंपन्यावर लक्ष ठेवण्यासाठी कायदा करण्याची गरज असल्याचे मत अनेक गुंतवणूकदारांनी व्यक्त केले आहे.

पोलिसांच्या धाकाने नातेवाइकांचे पलायन
चव्हाण याच्यासह जगताप व इतरांच्या नातेवाइकांची घरे बंद असल्याचे पोलिसांना आढळून आले आहे. दोन पथके तपास करीत आहेत. गावामध्ये आणि परिसरात चौकशी केल्यानंतर पोलिसांच्या धाकाने त्यांनी पलायन केल्याचे गावक-यांनी सांगितले.

नातेवाइकांसह एजंटांवर कारवाई
चव्हाण याच्या नातेवाइकांचे आणि काही एजंटांच्या नावे तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. तक्रारींमधील सर्वच संशयितांवर कारवाई करण्यात येणार आहे.
अनिल पवार, वरिष्ठ निरीक्षक, आडगाव पोलिस ठाणे