आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केदारनाथ, बद्रिनाथ यात्रा 2 दिवस स्थ‌गित

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - उत्तराखंडमध्ये बुधवारी अाणि गुरुवारी झालेला पाऊस, जाेशी मठापासून १२ किलाेमीटरवरील लांबगडमधील भूस्खलन ठिकठिकाणी दरडी काेसळल्यामुळे केदारनाथ, बद्रिनाथसह चार धाम यात्रा दाेन दिवसांसाठी स्थगित झाली. केदारनाथला अडकलेल्या ३९४ जणांना हेलिकाॅप्टरने गुप्तकाशीत नेण्यात अाले. बद्रिनाथमध्ये सुमारे १३ हजार भाविक अडकलेेले असून, निवास भाेजनाची व्यवस्था असल्यामुळे ते सर्वजण सुखरूप अाहेत. दरडी हटवून रस्ता माेकळा करण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात अाले. त्यामुळे २८ जूनपासून यात्रा पूर्ववत सुरू हाेण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली.

केदारनाथ बद्रिनाथ यात्रा समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. डी. सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, यात्रा मार्ग परिसरात बुधवारी गुरुवारी प्रचंड पाऊस झाला. त्यामुळे अनेक ठिकाणी दरडी काेसळून रस्ते बंद झाले. पावसाचा जाेर शुक्रवारी कमी झाल्यानंतर रस्ते माेकळे करण्याचे काम हाती घेण्यात अाले. परंतु, अाणखी पावसाची शक्यता लक्षात घेता याहून जास्त भाविक अडकून पडू नयेत, यासाठी यात्रा दाेन दिवसांकरिता स्थगित करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घेतला अाहे. रस्त्यातच अडकून पडलेल्या भाविकांशी संपर्क साधून त्यांना हेलिकाॅप्टरद्वारे सुरक्षित स्थळी हलविण्यास सुरुवात झाली अाहे.

बद्रिनाथमधील सर्व यात्रेकरू सुरक्षित
पाऊस दरडी काेसळल्यामुळे तीन दिवसांपासून सुमारे १३ हजार यात्रेकरू अडकलेले अाहेत. मात्र, हे सर्वजण सुरक्षित अाहेत. निवास भाेजनाची व्यवस्था पुरेशी असून, त्यांच्यासमाेर काेणत्याही अडचणी नाहीत. पाऊस थांबल्यावर रस्ते खुले झाल्यावर ते मार्गस्थ हाेतील. प्रकाश नारायण बाभूळकर शास्त्री, बद्रिनाथमधील महाराष्ट्राचे पुजारी

पावणेचार लाख भाविकांकडून अातापर्यंत दर्शन
दीडमहिन्यापासून सुरू झालेल्या या यात्रेत अातापर्यंत पावणेचार लाख भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला अाहे. दीड लाख भाविकांनी केदारनाथाचे, तर सव्वादाेन लाख भाविकांनी बद्रिनाथमध्ये दर्शन घेतले. दाेन वर्षांपूर्वी अालेल्या महाप्रलयानंतर सरकारने यात्रा समितीने निवासांसाठी बनविलेले सुरक्षित तंबू खाद्यपदार्थांसाठी लंगरची व्यवस्था केलेली अाहे. त्यामुळे यावर्षी यात्रेकरूंची संख्या वाढलेली अाहे.
बातम्या आणखी आहेत...