आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DvM SPL: व्हाॅट‌्सअॅपचा अाेटीपी ठेवा सुरक्षित; टू स्टेप व्हेरिफिकेशनही ठेवा सुरू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- व्हाॅट्सअॅपचे अकाउंट हॅक हाेण्याच्या तक्रारी वाढल्यानंतर अाता वापरकर्त्यांमध्ये घबराट पसरली अाहे. प्रत्येकाला अापले अकाउंट हॅक हाेण्याची भीती वाटत अाहे. ‘दिव्य मराठी’ने तक्रारदारांशी चर्चा केली असता हॅकर फसवणुकीसाठी नक्की काेणती प्रणाली वापरत अाहे हे लक्षात अाले. व्हाॅट्सअॅपवर वन टाइम पासवर्ड दिल्यामुळेच अकाउंट हॅक झाल्याचे यानिमित्ताने पुढे अाले अाहे.
 
व्हाॅट्सअॅपच्या सेटिंगमधील ‘टू स्टेप व्हेरिफिकेशन’ हा पर्याय वापरात अाणल्यास अशा फसवणुका टाळता येतील, असे सायबरतज्ज्ञ सांगतात. ओटीपी प्राप्त होताच संबंधित व्हॉट्सअॅप अकाउंटसुद्धा हॅक होते. या प्रकाराबाबत सायबर पोलिस स्टेशन येथे प्रारंभी डॉ. गौरी पिंपरीकर व नीलेश सुदाम दाते यांनी तक्रार दाखल केली आहे. गुरुवारी मात्र या तक्रारींची संख्या वाढून ती तब्बल २८ च्या घरात पाेहाेचली अाहे. सायबर पोलिस स्टेशन येथे यासंदर्भात माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० च्या कलमानुसार गुन्हा दाखल झाला अाहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दीपक देसले पुढील तपास करत आहेत.

भारतभरात अॅटॅक
संपूर्ण भारतात व्हाॅट्सअॅप अाणि फेसबुक अकाउंट हॅक हाेण्याचे प्रकार सुरू झाले अाहेत. मिळालेल्या माहितीनुसार २७ च्या रात्री अकाउंट हॅक हाेण्यास सुरुवात झाली. अाजवर हजाराे अकाउंट हॅक झाल्याची भीती व्यक्त केली जात अाहे.

अकाउंट हॅक झाल्यानंतर हॅकर काय करताे
- महिलांशी गप्पा करत त्यांच्याकडून त्यांचे कमी कपड्यातील फाेटाे मागवताे.
- महिलांना अश्लील संदेश पाठवताे.
- महिला वा पुरुषांच्या अकाउंटवरील अन्य सदस्यांचे नंबर मिळवून ते हॅक करण्याचा प्रयत्न करताे.
- ग्रुपमधून अापल्याला लेफ्ट करताे.
- बँकेशी संबंधित गाेपनीय माहिती मागवताे.

काेणालाही अाेटीपी देऊ नका
काेणत्याही ओळखीच्या किंवा अनोळखी व्यक्तीने व्हॉट्सअॅपवर चॅट करून ओटीपीची मागणी केल्यास ओटीपी देऊ नये. तसेच स्वतःचे व्हॉट्सअॅप अकाउंट टू स्टेप व्हेरिफिकेशन करून व्हॉट्सअॅप कोड सुरक्षित करावे. व्हॉट्सअॅपसंबंधी काही तक्रार असल्यास त्वरित सायबर पोलिसांशी संपर्क साधावा. 
- अनिल पवार, वरिष्ठ पाेलिस निरीक्षक, सायबर क्राइम पाेलिस स्टेशन

माझ्या अकाउंटमधून तीन लाख लांबवले 
मी एमएसईबीत कार्यरत असताना जे सिमकार्ड वापरत हाेताे ते सेवानिवृत्तीनंतर एमएसईबीत जमा केले. कार्ड बँक अकाउंटशी जाेडलेले हाेते. कार्ड जमा करताना त्याला जाेडलेला माेबाइल क्रमांक बँकेतून रद्द करावा हे मला माहिती नव्हते. त्यानंतर संबंधित सिमकार्ड एमएसईबीने दुसऱ्या कर्मचाऱ्याला दिले. मात्र, माझ्या बँकेच्या अकाउंटची माहिती या कर्मचाऱ्याला जात हाेती. या कर्मचाऱ्याकडून शर्मा नावाच्या एका व्यक्तीने फाेन करून जे संदेश येतात त्याची माहिती घेतली. त्यानंतर माझ्या अकाउंटमधून तब्बल ३ लाख रुपये लांबवण्यात अाले. 
- प्रभाकर साेनवणे, फसवणूक झालेले सेवानिवृत्त कर्मचारी

अाधी शहानिशा करा
काेणी फाेटाे, व्हिडिअाे वा खासगी काेणतीही माहिती विचारत असेल तर प्रथमत: संबंधितांना थेट काॅल करून शहनिशा करावी. वन टाइम पासवर्ड काेणालाही देऊ नये. सर्वात महत्त्वाचे म्हणजे बँकेशी, अाधार कार्डशी वा पॅन कार्डशी जाेडले गेलेले माेबाइल नंबर दुसऱ्याला हस्तांतरित करू नये. 
- तन्मय दीक्षित, सायबरतज्ज्ञ

अाेटीपी क्रमांकावरून माझे अकाउंट हॅक
माझ्या मैत्रिणीचा मला संदेश अाला की, तुझा माेबाइल नंबर मी अकाउंट सुरू करण्यासाठी दिला अाहे. तुला जाे अाेटीपी नंबर अाला ताे तातडीने पाठव. मी अाेटीपी नंबर पाठवला. काही वेळात माझ्या नंबरवरून काही मैत्रिणींना वेगवेगळे संदेश पाठवले गेले. त्यात काहींना शंका अाल्यावर त्यांनी मला संपर्क करून विचारले. तेव्हा लक्षात अाले अापले अकाउंट हॅक झाले. 
- प्रज्ञा भाेसले, ताेरस्कर, तक्रारदार

अकाउंट हॅक हाेऊ नये म्हणून काय करावे?
- व्हाॅट्सअॅपला असलेले टू स्टेप व्हेरिफिकेशन सुरू असावे.
- टू स्टेप व्हेरिफिकेशन असे करावे : अकाउंटमधून सेटिंगमध्ये जावे. तेथील टू स्टेप व्हेरिफिकेशनच्या पर्यायाला क्लिक करावे. त्यानंतर सहा अाकडी पासवर्ड टाकावा, जाे पुढे अापल्या लक्षात राहील व अन्य काेणी सहजासहजी अाेळखूही शकणार नाही. त्यानंतर ई-मेल अायडी टाकावा.
- व्हाॅट्सअॅप लाॅक हाेऊ शकतील असे अॅप्लिकेशन टाकावेत.
बातम्या आणखी आहेत...