आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेशनच्या केरोसीनचा साराच गफला, रॉकेल बंदीचाही गैरफायदा...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रेशनवरील रॉकेलचा काळाबाजार कायमस्वरूपी थांबविण्यासाठी शासनाने रेशनवरील अनुदानित रॉकेल विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शहरातील शेकडो गोरगरीब लाभार्थ्यांना गेल्या तीन महिन्यांपासून रॉकेल मिळाले नसल्याची बाब समोर आली आहे. एकीकडे शहरातील सर्वच नागरिकांकडे गॅस सिलिंडर असल्याचे गृहित धरून सर्वांचेच रॉकेल बंद केल्याने गोरगरिबांचे हाल होत आहेत. दररोज स्वयंपाक करणार कसा, या चिंतेने त्रस्त असलेल्या या लाभार्थ्यांना रॉकेलच वितरण करण्यात आले नसल्याच्या तक्रारी ‘डी. बी. स्टार’कडे आल्या आहेत. प्रशासनाने मात्र मार्च महिन्याचे रॉकेलचे नियतन प्राप्त झाले असून, त्याचे वितरणही सुरू आहे. परंतु, लाभार्थ्यांना राॅकेल मिळत नसल्याने ते नेमके जाते कुठे, असा प्रश्न उपस्थित हाेत आहे. त्यावर हा प्रकाशझोत...
सध्यास्वस्त धान्य दुकानात केवळ गहू, तांदुळ दारिद्र्यरेषेखालील कुटुंबासाठी अर्धा किलो प्रति माणूस साखर दिली जाते. तसेच गॅस सिलिंडर नसलेल्यांसाठी माणसी अर्धा लिटर रॉकेल किंवा एका रेशनकार्डवर जास्तीत जास्त चार लिटर रॉकेल दिले जाते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून केरोसीनपात्र शिधापत्रिकाधारकांना आता रॉकेलदेखील मिळत नसल्याने आता स्वयंपाक करण्याचीही अडचण निर्माण झाली आहे.

अशा परिस्थितीत अन्न शिजविणार तरी कसे, असा यक्षप्रश्न अनेक गाेरगरिबांसमोर उभा ठाकला आहे. विशेष म्हणजे, शहरात गॅस जोडणी आणि अनुदानित सिलिंडरची संख्या पाहता प्रत्येकाच्या घरात गॅस असल्याचे गृहित धरून सरसकट सर्वांचेच अनुदानित रॉकेल बंद करण्याचा अजब निर्णय शासनाच्या वतीने घेण्यात आला आहे. प्रत्यक्षात जुने नाशिक, पंचवटी, वडाळागाव, तसेच उपनगर परिसरात आजही अनेक घरांमध्ये गॅस कनेक्शनच नाहीत. अशा कुटुंबीयांचेदेखील रॉकेल बंद करण्यात आले असल्याच्या तक्रारी माेठ्या प्रमाणावर ‘डी. बी. स्टार’कडे अाल्या अाहेत. त्याविरोधात नागरिकांनी तीव्र नाराजीदेखील व्यक्त केली आहे.

एप्रिलमहिन्यात १३४४ केएल रॉकेल; तरीदेखील लाभार्थी वंचितच
एप्रिल महिन्यात नाशिक जिल्ह्यासाठी १३४४ केएल रॉकेल प्राप्त झाले आहे. शिवाय त्याची उचल २५ एप्रिलपर्यंत करण्याचे आदेश जिल्हा पुरवठा विभागाकडून सर्वच तालुक्यांना देण्यात अाले आहेत. त्याची उचलही सुरू आहे. पण, लाभार्थ्यांना मात्र रॉकेलच मिळत नसल्याने हे रॉकेल नेमके जाते तरी कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मधल्यामध्येच ते गायब केल्याचाही संशय यानिमित्ताने व्यक्त केला आहे.
एकूण केरोसीनपात्र लाभार्थी
३५ हजार ३७

अचानक पुरवठा बंद, महिन्यांपासून रॉकेल नाही
गेल्यातीन महिन्यांपासून रेशन दुकानांमार्फत मिळणारा रॉकेल पुरवठा अचानक बंद करण्यात अाला असून, अाता रॉकेल मिळत नसल्यामुळे स्वयंपाक करण्यातही मोठी अडचण निर्माण होत आहे. - सईद पहेलवान शेख, लाभार्थी,जुने नाशिक

काळाबाजार बंद करण्याची गरज...
शहरातील रेशनदुकानांकडून लाभार्थ्यांना अनुदानित रॉकेल दिले जात नसल्यामुळे गोरगरीब रुग्णांचे हाल होत आहे. तर काही दुकानांमार्फत या रॉकेलचा काळाबाजार केला जात आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. जेणेकरून गाेरगरिबांना राॅकेल मिळून त्यांची स्वयंपाकाची अडचण दूर हाेऊ शकेल. - अजीज पठाण, जिल्हाध्यक्ष,छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड, नाशिक

जिल्ह्यात ३५ हजारांहून अधिक केरोसीनपात्र लाभार्थी
एकीकडे गॅस असल्याने सर्वच लाभार्थ्यांचे रॉकेल बंद करण्याच्या तयारीत असलेला जिल्हा पुरवठा विभाग स्वत:च जिल्ह्यात ३५ हजार ३७ कार्डधारक हे केरोसीनपात्र असल्याचे सांगत आहे. शिवाय त्यांचे अनुदानही मंजूर करते. पण ते लाभार्थ्यांपर्यंत पोहाेचत नसल्याने ‘आंधळं दळतंय आणि कुत्रं पीट खातंय’ असेच चित्र सध्या दिसून येत आहे.

रॉकेल बंदीचाही गैरफायदा...
काही रेशन दुकानदारांनी काळ्या बाजारात रॉकेलचा पुरवठा करण्यासाठी ते साठवून ठेवले होते. आता या रॉकेलवर बंदी घालण्यात आल्याने याच दुकानदारांकडून त्याचा गैरफायदा घेऊन ७० ते ८० रुपये प्रति लिटरने रॉकेल विक्री केला जात आहे.

केसरी शिधापत्रिका उरली नावालाच
लाखापेक्षा अधिक उत्पन्न असलेल्यांना दिलेल्या शुभ्र कार्डवर कुठलेही धान्य अथवा लाभ मिळत नाही. पण, नियमानुसार शहरात ५९ हजार, तर ग्रामीणमध्ये ४२ हजार वार्षिक उत्पन्न असलेल्या केसरी शिधापत्रिकाधारकांचाही प्राधान्य कुटुंबात समावेश करण्यात आला आहे. परंतु, त्यातही अनेक त्रुटी असून या अटीत बसणाऱ्यांनाही रेशनचे कुठलेच लाभ दिले जात नाही. त्यामुळे त्यांच्या केसरी शिधापत्रिका केवळ ओळख दाखविण्यापुरत्याच आहेत.

लाभार्थ्यांकडून रोजच चौकशी
गेल्या तीन महिन्यांपासून रॉकेल दिले जात नसल्याने त्याची वारंवार विचारणा नागरिकांकडून रेशन दुकानदारांना केली जात आहे. रॉकेल आता कधी मिळणार? पुन्हा रॉकेल मिळणार की नाही? असे विविध प्रश्न लाभार्थ्यांकडून विचारले जात असून मिळाल्यास आपल्या उदरनिर्वाहाचे काय, असा प्रश्नही त्यांना भेडसावत आहे.

तीन महिन्यांपासून मिळेना रॉकेल
जुने नाशिक परिसरात दारिद्र्यरेषेखालील नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. अनेकांची उदरनिर्वाह तर रेशन दुकानातून दिल्या जाणाऱ्या शिधेवरच अवलंबून आहे. मात्र, गेल्या तीन महिन्यांपासून अचानक अनुदानित रॉकेल बंद करण्यात आल्याने या स्वयंपाकासाठी खुल्या बाजारातील रॉकेल त्यांना घ्यावे लागत आहे. जादा दराने रॉकेलची खरेदी केल्याने त्याचा परिणाम इतर बाबींवर होत असल्याने रेशनचे रॉकेल मिळावे, अशी अपेक्षा या नागरिकांकडून केली जात आहे.

श्रीमंतांच्या यादीत गरीब लाभार्थी
जिल्हा पुरवठा विभाग आणि धान्य वितरण विभागाकडून बीपीएलसह प्राधान्य कुटूंब लाभार्थ्यांची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. यापूर्वीच थेट क्रॉस चेकिंगही करण्यात आली. मात्र त्यामध्ये अनेक धनाढ्य आणि श्रीमंतांचा समावेश बीपीएल यादीत असल्याचे खुद्द पुरवठा विभागाच्याच निदर्शनास आले. शिवाय याउलट श्रीमंतांच्या यादीत अचानक या गरिबांचीही नावे समाविष्ट करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचे रॉकेल बंदच झाले आहे. अनेकांच्या घरात स्वयंपाक करणेही कठीण झाले आहे. त्याची परिणती गेल्या तीन महिन्यांपासून रॉकेलपात्र या लाभार्थी रॉकेलपासून वंचित असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहे.

दुकानदारच करणार सर्व्हे
अनुदानित रॉकेल बंद करण्यासाठी आता ‘डाेअर टू डाेअर’ सर्व्हे करण्याची जबाबदारी जिल्हा पुरवठा विभागाने दुकानदारांवरच सोपविली आहे. विशेष म्हणजे, नागरिकांचे आधार जोडणीसह त्यांची सर्वच माहिती रेशनदुकानदारांनाच करावी लागत आहे. आता गॅस स्टँम्पिंगसह प्रत्येक घरात गॅस कनेक्शन आहे की नाही, याची तपासणी दुकानदारांनाच करावी लागत असल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे सर्व्हेही दुकानातूनच केला जात असल्याचा संशय वाढला आहे.
शासनाने वितरित करूनही लाभार्थी प्रतीक्षेतच; प्रशासन म्हणतंय, ‘तक्रारी द्या.. कारवाई करू...’
महेश पाटील, प्रभारीजिल्हा पुरवठा अधिकारी
थेट प्रश्न
*शासनाने सर्वचकेरोसीन बंद केले?
-अजिबात नाही. शासकीय नियमानुसार पात्र लाभार्थ्यांना ते दिले जात आहे. त्यासाठी मंजूर असलेल्या कोट्यानुसारच त्याचे वितरण होत आहे.
*अनेक लाभार्थ्यांनारॉकेलच मिळत नसल्याच्या तक्रारी येत आहे .
-तसे असल्यास आमच्याकडे तक्रार करावी. नक्कीच कठोर कारवाई केली जाईल.
*चालू महिन्यातरॉकेल प्राप्त होऊनही ते वितरित केले नाही का ?
-असे नाही, प्राप्त झालेल्या नियतानुसार त्याचे त्या-त्या तालुक्यांना आणि दुकानदारांना वितरण सुरू आहे.
बातम्या आणखी आहेत...