आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळांचा थाट, पालकांची वाट; प्रशासन बघते मुकाट, के. जी.च्या अर्जांसाठी अाली तिष्ठण्याची वेळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- के.जी. प्रवेशाच्या प्रक्रियेला डिसेंबरमध्येच सुरुवात झाली असली तरी काही तथाकथित प्रतिष्ठित शाळा राेजच ‘प्रवेश अर्ज उद्या साेडणार’ अशी माहिती पसरवून पालकांच्या संयमाचा अंत पाहात अाहेत. या प्रवेश प्रक्रियेवर शिक्षण विभागाचे काेणतेही िनयंत्रण नसल्यामुळे पालकांवर शाळा प्रवेशद्वारावर ड्यूटी करण्याची वेळ अाली अाहे.
शहरात अांतरराष्ट्रीय ख्यातीच्या अनेक शाळांसह प्ले स्कूल, नर्सरीपासून बालवाडी ते बारावीपर्यंत शिक्षण देणाऱ्या इंग्रजी माध्यमांच्या शाळा वाढल्या अाहेत. िवशिष्ट शाळेत पाल्याला प्रवेश िमळवण्यासाठी पालकांची धडपड असून, त्यासाठी हवी िततकी पदरमाेड करण्याचीही तयारी दाखवली जात अाहे. मात्र, प्रवेशासाठी अर्ज मिळवणे हा पहिला अडथळा पार करणेही कठीण झाले अाहे. शिक्षण विभागाचे प्रवेश प्रक्रियेवर काेणतेही निर्बंध नसल्याचा फायदा संस्थाचालकांकडून घेतला जात अाहे. परिणामी, काही शाळा त्यांच्या साेयीनुसार प्रवेशप्रक्रिया राबवत असल्याच्या तक्रारी असून, वेळापत्रक निश्चित नसल्यामुळे पालकांना अक्षरश: शाळांवर वाॅच ठेवण्याची वेळ अाली अाहे. मध्यंतरी, गंगापूरराेड भागातील काही शाळांमध्ये सकाळी अर्ज सुटणार असल्याचे वृत्त अाल्यानंतर पालकांना अक्षरश: रात्रभर कडाक्याच्या थंडीत िचमुरड्यांसह बसून रांग लावण्याची वेळ अाली हाेती.
असेघडले हाेते २०१३ मध्ये : नर्सरी,के. जी. पासून पहिलीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी खासगी शाळा नाेव्हेंबरमध्येच प्रक्रिया सुरू करीत. प्रत्येक शाळेचा कार्यक्रम संस्थेच्या साेयीनुसार हाेत असल्यामुळे पालकांची गैरसाेय हाेत हाेती. त्यातूनच एजंटगिरी आणि प्रवेश शुल्काच्या माध्यमातून पालकांच्या िखशाला चाट लावण्याचे प्रकार घडले हाेते. ही बाब राज्य सरकारने गांभीर्याने घेऊन नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी महिनाभर आधी प्रवेश प्रक्रिया राबवण्याचे आदेश शाळांना दिले हाेते. यंदा मात्र असे काेणतेही अादेश नसल्याचे शिक्षण विभागाचे अधिकारी सांगत अाहेत.
प्रवेश प्रक्रियेचे चित्रीकरण
नर्सरीप्रवेशाबाबत सर्व शाळांना पत्र देण्यात आले आहे. ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्याच्या सूचना केल्या आहेत. प्रवेश प्रक्रियेचे चित्रीकरण करताना ड्रॉ पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. तसेच, प्रवेश प्रक्रिया राबवताना वेटिंग लिस्टही शाळेमध्ये लावण्यात यावी. किरणकुंवर, प्रशासनाधिकारी,महापालिका
डाेनेशन घेऊन देतात प्रवेश...
शाळेतगेल्यावर प्रवेश अर्जही दिला जात नाही. नंतर मात्र सक्षम पालकांकडून भरमसाठ डोनेशन घेऊन प्रवेश देण्यात येतात. -दिनेश चव्हाण, पालक

वयाच्या अटींमुळे गोंधळ...
विशिष्टवय असेल तरच प्रवेश िमळेल, अशा सूचना अाहेत. मात्र, शाळांचे िनयम वेगवेगळे असल्याने पालकांचा गाेंधळ उडत अाहे. -योगेश आरोटे, पालक