आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खडसे- दमानियांची न्यायालयीन लढाई सुरू, न्यायालयात अाज पहिली सुनावणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - एकनाथ खडसे विरुद्ध अंजली दमानिया यांच्यातील न्यायालयीन लढाई शनिवारपासून सुरू हाेत अाहे. खडसेंची बदनामी केल्याच्या अाराेपावरून दमानियांविराेधात १६ तक्रारी विविध काेर्टात दाखल अाहेत. पहिल्या खटल्याची सुनावणी मुक्ताईनगर न्यायालयात सुरू हाेत अाहे. दमानिया यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या अाराेपांमुळे खडसे यांना मंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले होते. त्यामुळे खडसे समर्थक कार्यकर्त्यांमध्ये दमानियांविराेधात संताप व्यक्त झाला. खडसे समर्थकांनी दमानियांविराेधात आतापर्यंत मुक्ताईनगर, मलकापूर, अकोला, पुणे, तुळजापूर, उस्मानाबाद या ठिकाणी बदनामीचे खटले दाखल केले अाहेत, अशी माहिती अॅड. हुरूल देवरे आणि अॅड. विजय पाटील यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली.
‘भाजपची प्रतिमा मलिन केल्याच्या या तक्रारी कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या तालुका न्यायालयात दाखल केल्या आहेत. अन्य खटल्यांमध्ये तक्रारदारांच्या जबानी सुरू आहेत. मुक्ताईनगरच्या खटल्यात दमानिया यांच्याविरोधात समन्स जारी करण्यात आले आहे,’ असे देवरे यांनी सांगितले. दमानिया यांनी मात्र आपल्याला अद्याप समन्स मिळाले नसल्याचे सांगितले.
पुढे वाचा...
> खडसेंनी हिंमत का नाही दाखवली?
>मी स्वत: शंभर काेटींचा दावा दाखल करणार - एकनाथ खडसे

बातम्या आणखी आहेत...