आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिचा खेळ ती मांडतेही, पेलतेही, जगणं पेलताना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - तिचंअायुष्य म्हणजे पाण्याचा बुडबुडा, काचेचं भांडं अशा क्षणात उध्वस्त हाेणाऱ्या कच्च्या धाग्यात गुंतलेलं. तिचं अायुष्य म्हणजे तिचं नाहीच, त्यावर अधिकारच मुळी पुरुषाचा, तिचं अायुष्य म्हणजे समाज व्यवस्थेने लाथाडलेली अडगळीतली वस्तू... पण अशा अायुष्याशी संघर्ष करूनही ती स्वत:चं जगणं पेलते अाणि ‘माझा खेळ मांडू दे’ म्हणत सुरुवातीचे अश्रू पुसत ताे खेळ मांडतेही अाणि निभावतेही... ही अनुभूती रसिकांनी घेतली ‘माझा खेळ मांडू दे’ या नाटकातून.
नाशिकच्या कलाकारांच्या जनस्थान या व्हाॅट्स अॅप ग्रुपच्या उत्सवाचे दुसरे पुष्प या नाटकाने गुंफले. सई परांजपे लिखित अाणि विद्या करंजीकर दिग्दर्शित या नाटकाने स्त्रीच्या भावविश्वाचा वेध घेतला. १९७० च्या दशकातील नाटक असलं तरी ते अाजही वास्तवाच्या जवळ जाणारं असल्याचं कलाकारांच्या सक्षम अभिनयातून अधाेरेखित झालं. सेवा श्राॅफ यांच्याकडे मामी, पद्मिनी अाणि रिबेका या तिघी पेईंग गेस्ट म्हणून येतात. पुरुषी अत्याचारातून पिचलेल्या तिघींची कथा यात अाहे. रिबेकाला गाेवर्धन त्रास देत असताे. तर पद्मिनीच्या पतीचे दुसऱ्या मुलीवर प्रेम असते. मामींवर त्यांचा सासरा अत्याचार करताे. अशी तिघींची कहाणी. दु:खद प्रसंग असाे वा हसण्याचे, त्यांनी कधी टाळ्या तर कधी हळहळ रसिकांकडून वसूल केली. इतर भूमिकांमध्ये लक्ष्मी पिंपळे, पल्लवी पटवर्धन, प्रिया तुळजापूरकर, शाम लाेंढे, धनंजय वाबळे अाणि पंकज क्षेमकल्याणी हाेते. नाटकाचे नेपथ्य शाम लाेंंढे, संगीत धनंजय धुमाळ, प्रकाशयाेजना विनाेद राठाेड, वेशभूषा हेमा जाेशी, स्नेहल एकबाेटे अाणि रंगभूषा माणिक कानडे यांची हाेती. या नाटकाला रसिकांनी माेठी गर्दी केली हाेती.
बातम्या आणखी आहेत...