आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ख्वाजा गरीब नवाज उरूसनिमित्त शहरात विविध कार्यक्रम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - जगभरात प्रसिद्ध सुफीसंत हजरत ख्वाजा गरीब नवाज यांचा पवित्र उरूस शरीफनिमित्त मंगळवारी जुने नाशिकसह, वडाळागाव, सिडको, सातपूर, नाशिकरोड परिसरात विविध कार्यक्रम झाले.
जुन्या नाशकात ठिकठिकाणी अजमेर शरीफचा देखावा तयार करण्यात येऊन हिरवे झेंडे, पताका लावण्यात आले होते. इस्लामी तारखेप्रमाणे 6 रज्जब रोजी पवित्र ‘छट्टी शरीफ’चे फातेहा पठण झाले. मंगळवारी सकाळी मुस्लिम बांधवांनी घरांमध्ये खीर-पुरीवर फातेहा पठण करून प्रसाद वाटप केले. तसेच, शहरातील चौकाचौकांमध्ये सामूहिक खीरचे वाटप करण्यात आले. पवित्र उरूस ‘छट्टी शरीफ’निमित्त सोमवारी शहरातील शाही मशीद, खडकाळी मशीद, हेलबावडी मशीद, जुम्मा मशीद, अजमेरी मशीद, वडाळागाव येथील गौसिया मशीदमध्ये सामूहिक कुराणाचे वाचन करण्यात आले. त्याचप्रमाणे खडकाळी, बागवानपुरा, कथडा, नानावली, मीरा दातार चौक, अजमेरी चौक, नाईकवाडीपुरा, पठाणपुरा, मुलतानपुरा, कोकणीपुरा, दूधबाजार, सारडा सर्कल, इंदिरानगर, वडाळागाव, शालिमार आदी ठिकाणी मुस्लिम तरुण मंडळांतर्फे खीरवर फातेहा पठण होऊन सर्वधर्मीयांना त्याचे वाटप करण्यात आले. मंगळवारी घरांमध्येही खीर-पुरी तयार करून फातेहा पठण झाले.