आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपहृत मुलगी सापडली गुजरात सीमेवर, आडगाव पोलिसांची यशस्वी कारवाई

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - महिन्यापूर्वी अपहरण झालेल्या सतरा वर्षीय मुलीची धुळे जिल्ह्यातून सुटका करण्यात आली आहे. जिल्ह्यातील गुजरात सीमेवर संशयिताने तिने लपवून ठेवले होते. ‘ऑपरेशन मुस्कान’ अंतर्गत बुधवारी (दि. ६) आडगाव पोलिसांनी धुळे येथे ही कारवाई केली. याप्रकरणी संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पीडित मुलीच्या पालकांनी तक्रार दिल्याने संशयितावर रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.

 

याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नोव्हेंबर महिन्यात एका सतरा वर्षीय मुलीचे अपहरण झाले होते. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस उपआयुक्तांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत ‘ऑपरेशन मुस्कान’अंतर्गत तपास करण्याचे आदेश दिले होते. आडगाव पोलिसांच्या पथकाने तंत्रविश्लेषण शाखेच्या मदतीने संशयिताचे मोबाइल लोकेशन शोधले असता ते धुळे जिल्ह्यात असल्याचे निदर्शनास आले. आडगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुनील पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक धनश्री पाटील, यशवंत गांगुर्डे, प्रीतम आवारे यांचे पथक धुळे येथे पाठवले.


पिंपळनेर पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक सुनिल भाबड, विजय पाटील यांच्या मदतीने संशयित राहत असलेल्या जागेवर सापळा रचून अपहरण झालेल्या मुलीला ताब्यात घेण्यात अाले. साध्या गणवेशात महिला कर्मचारी घरात थांबली. काही वेळाने संशयित आल्यानंतर पथकाने त्यास ताब्यात घेतले. चौकशीत हर्षल मधुकर बच्छाव (वय ४०, रा. दहिवेल, धुळे) असे नाव सांगितले. अधिक चौकशीत त्याचे लग्न झालेले असून धुळे न्यायालयात फारकतीचा खटला सुरू असल्याची माहिती संशयिताने दिली. पीडित मुलीस त्याने फूस लावून पळवून आणले होते. लग्न करून तिच्यावर अत्याचार केल्याची माहिती पोलिसांनी दिली. पीडित मुलीच्या पालकांनी समाजात बदनामीच्या भीतीने तक्रार दिल्याने संशयिताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचे वरिष्ठ निरीक्षक पुजारी यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...