आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपहरणकर्त्यास चोवीस तासांत अटक; बालकाची सुखरूप सुटका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - चॉकलेट घेऊन देण्याचा बहाणा करत दीड वर्षीय बालकाचे अपहरण करणाऱ्या संशयितास उपनगर पोलिस आणि गुन्हे शाखेच्या पथकाने चोवीस तासांत अटक करत सुखरूप सुटका केली. रविवारी (दि. २३) रात्री ११.३० वाजता सीबीएस बसस्थानकात पथकाने ही कारवाई केली. उसनवार दिलेले पैसे देण्यास विलंब झाल्याने संशयिताने बालकाचे अपहरण केले होते. पोलिसांनी अतिशय गोपनीय तपास करत संशयितास अटक केली.
जेलरोड येथून शुक्रवारी (दि. २१) रात्री वाजता दीड वर्षीय बालकाचे अपहरण झाल्याची तक्रार सतीश विध्वंस यांनी दोन दिवसांपूर्वी उपनगर पोलिस ठाण्यात दिली होती. संशयित किशोर बाळासाहेब गोडसे (रा. संसरी) यावर संशय व्यक्त केला होता.

घटनेचे गांभीर्य ओळखत पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंघल यांच्या मार्गदर्शनाखाली गोपनीय तपास सुरू केला. तक्रारदाराकडे संशयिताबाबत कुठलीही माहिती नसल्याने पोलिस अधिकारी चक्रावले होते. रेल्वे, बस स्थानक, पंचवटी, तपोवन, त्र्यंबकेश्वर येथे शोध घेतला, मात्र पोलिसांना शोध घेण्यास अपयश येत होते. अखेर रविवारी (दि.२३) विध्वंस यांच्या मोबाइलवर संशयिताने फोन करून ‘बँकेमध्ये ६५ हजार रुपये जमा केले नाही, तर मुलगा अथर्व परत मिळणार नाही’, असा दम दिला. याबाबत विध्वंस यांनी पोिलसांना कळवल्यानंतर यंत्रणा सतर्क झाली. तत्काळ तपासाची सूत्रे वेगाने फिरवत तंत्र विश्लेषण शाखेच्या मदतीने मोबाइलचे लोकेशन मिळवले. गंगापूररोडवर एका बांधकाम साईटवर काम करणाऱ्या मजुराचा ताे माेबाइल क्रमांक निघाला. चाैकशीत संशयिताने मजुराचा माेबाइल फोन घेत त्यावरून काॅल करत खंडणीची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. मात्र, त्याच्यासाेबत एक मुलगा हाेता त्याच्याकडे पैसे नसल्याने त्याला २० रुपये दिले त्यानंतर ताे मुलासह ताे निघून गेल्याचे या मजुराने पाेलिसांना सांगितले. या एका धाग्यावरून पाेलिस पथकाने संपूर्ण शहर पिंजून काढले. अखेर रात्री ११.३० वाजता अपहृत मुलगा आणि संशयित सीबीएसवर एका कोपऱ्यात बसलेला अाढळून आला. पथकाने शिताफीने संशयितास अटक करून मुलाची सुखरूप सुटका केली.

सतर्कता राखल्याने पाेलिसांना यश
^अपहरणाचा प्रकार गंभीर होता. अशा प्रकरणात संशयितांकडून गंभीर गुन्हा घडल्याचे प्रकार घडले आहेत. पथकाने सतर्कता बाळगत गोपनीय तपास केला. त्यामुळे एका बालकास सुखरूप सोडवण्यात यश आले. पोलिस मित्रांच्या मदतीने पथकाने केलेली कामगिरी उल्लेखनीय ठरली. -डॉ.रवींद्रकुमार सिंघल, पाेलिस अायुक्त

पथकाचे अभिनंदन
उपआयुक्त श्रीकांत धिवरे, सहायक आयुक्त मोहन ठाकूर, निरीक्षक अशोक भगत, सहायक निरीक्षक श्रीराव, उपनिरीक्षक महेश शिंदे, अशोक साळवे, विजय गवांदे, अनिल शिंदे, रोहित भावले, बाळू मांदळे आणि दोन पोलिस मित्रांचा पोलिस आयुक्तांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

पोलिसांमुळे माझा अथर्व सुखरूप...
^लग्नासाठी४०हजार रुपये उसने घेतले होते. तीन महिन्यांपासून रात्रीअपरात्री पैशांसाठी तगादा लावला होता. पैशांसाठी मुलाला पळवले. पैशांची मागणी केली. पोलिसांनी वेळीच सतर्कता दाखवत मुलाची सुखरूप सुटका केली. पोलिसांमुळेच माझा अथर्व सुखरूप परत मिळाला. -सतीशविध्वंस, मुलाचे वडील

नाशिक | एकादीड वर्षीय बालकास सुखरूप सोडवण्यात पोलिसांना यश आले असतानाच एका वर्षीय मुलाचे आडगाव येथून अपहरण झाल्याचा प्रकार शनिवारी (दि. २२) उघडकीस आला. या प्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती आणि जयश्री पगारे (रा. आडगाव) यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, शनिवारी सायंकाळी वाजेच्या सुमारास लेंडीनाला रोड, आडगाव येथील शेतात खेळत असताना हर्ष विशाल पगारे (वय ९) बेपत्ता झाला. दोन दिवस परिसरात शोध घेऊन तो मिळाल्याने अखेर पगारे यांनी आडगाव पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तत्काळ अपहरणाचा गुन्हा दाखल केला. वरिष्ठ निरीक्षक संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
बातम्या आणखी आहेत...