आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Kidney Transplant Surgery Latest News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'संदर्भ'मध्ये मोफत किडनीरोपण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- खासगी रुग्णालयात तीन ते पाच लाख रुपयांचा खर्च होणा-या किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेची सुविधा संदर्भ रुग्णालयात गरजूंसाठी मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विविध गंभीर आजारांच्या शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आतापर्यंत रुग्णालय प्रशासनास यश आले आहे.
मात्र, किडनीविकारग्रस्त रुग्णांसाठी अशा प्रकारची सुविधा नव्हती. मूत्रपिंडाशी संबंधित अन्य शस्त्रक्रिया होत होत्या. त्यानंतर आता थेट किडनी प्रत्यारोपण व्यवस्थापनाचे नियोजन पूर्ण झाले असून, एक महिन्यात तज्ज्ञांची नियुक्ती केली जाणार आहे.
दर्जेदार रुग्णसेवा मिळण्यासाठी आरोग्य विभागाने संदर्भ सेवा रुग्णालय सुरू केले असून, हजारो गरजूंनी त्याचा लाभ घेतला आहे. किडनी प्रत्यारोपण करण्यासाठी खासगी रुग्णालयात लाखांच्या घरात खर्च येत असल्याने साधारण स्थितीतील अनेक रुग्ण उपचार अर्धवट सोडत होते. त्यासाठी आरोग्य विभागाकडे पाठपुरावा सुरू होता. आरोग्य विभागाच्या प्रधान सचिव सुजाता सौनिक यांच्या अलीकडच्या दौऱ्यादरम्यान प्रत्यारोपण सुविधेवर चर्चा झाली. या विषयाला तत्काळ मंजुरी देत तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यासाठी वित्त विभागाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. प्रस्ताव मंजूर झाला असून लवकरच तज्ज्ञ सेवेत दाखल होतील, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.