आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपच्या विषयपत्रिकेवर सर्वात प्रथम किकवी धरण, जलसंपदा-महापालिकेची हाेणार ‘युती’

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - मराठवाड्याला पाणी सोडल्यानंतर टीकेचे लक्ष्य झालेल्या भाजपने आता दरवर्षीच होणाऱ्या संभाव्य वादात नाशिकचे पर्यायाने स्वत:चे होणारे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी पालिकेच्या कामकाजाच्या अजेंड्यावर सर्वप्रथम किकवी धरण घेण्याचा निर्णय घेतला आहे. योगायोगाने मुख्यमंत्र्यांनी नाशिक दत्तक घेतल्यामुळे पालकत्वही जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे असल्यामुळे निधीबाबत शासन पालिका यांच्यातील होणारा वाद टाळून किकवीसाठी पाठपुरावा सुरू होणार आहे.
 
१६ लाख लोकसंख्येपर्यंत पोहोचलेल्या नाशिक शहरात सर्वात मोठी समस्या पाण्याची आहे. आजघडीला धरणात मुबलक पाणीसाठा असल्यामुळे या समस्येची धग कमी असली तरी एखाद दुसरा महिना जरी पावसाने टाळला तर धरणातील पाण्यासाठी शेजारील जिल्हे आक्रमक होत असल्याचे गेल्या वर्षी दिसून आले. त्यातून नगरच नव्हे, तर मराठवाडा पाण्यासाठी आक्रमक झाला न्यायालयीन लढाईत नाशिकला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातून एक टीएमसीइतके पाणी सोडावे लागले.
 
त्याची भयंकर झळ नाशिकला बसली ३० टक्के पाणीकपातीचा सामना करावा लागला. इतिहासात प्रथमच दर आठवड्यात एक दिवस पाणी बंद ठेवण्याची वेळ आली. यामुळे भाजपची प्रतिमा मलिन झाली; मात्र आता सत्तेवर आल्यावर पाण्याचा प्रश्न निकाली काढण्याचे भाजपने मनावर घेतले आहे. त्यामुळेच किकवी या गंगापूर धरणाला पर्यायी प्रकल्पाकडे लक्ष केंद्रित केले आहे. 
 
महापौर, उपमहापौर निवडणुकीनंतर किकवी प्रकल्पासाठी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यासमवेत चर्चा केली जाणार आहे. यापूर्वी किकवीला निधी कोणी द्यायचा, यावरून पालिका जलसंपदा खात्यात वाद झाला होता. आता दोन्ही यंत्रणा भाजपच्या ताब्यात असल्यामुळे योग्य तो तोडगा निघण्याची आशा आहे. 
 
किकवी धरण बांधण्याची संकल्पना पुढे आली तेव्हा साधारण तीनशे कोटींचा खर्च अपेक्षित होता; मात्र भूसंपादनापासून अन्य प्रक्रियेत हा प्रकल्प पुढे ८०० कोटींच्या घरात गेला. राज्यातील जलसंपदा खात्याकडे निधी नसल्यामुळे यापूर्वीच अनेक मान्यताप्राप्त सिंचन प्रकल्पांना कात्री लावली गेली आहे. त्यात किकवीही असल्याचे सांगितले जात होते; मात्र आता भाजपने हा प्रकल्प मनावर घेतल्यामुळे किकवी प्रत्यक्षात येण्याची आशा निर्माण झाली आहे. 
 
मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांकडे पाठपुरावा 
भविष्यातकिकवीधरण पाणीपुरवठ्यासाठी आवश्यकच आहे. नाशिकचा झपाट्याने विस्तार होत असून, वाढीव लोकसंख्येच्या पाण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा आहे. मुख्यमंत्र्यांनी नाशिक दत्तक घेतल्यामुळे ते निधी देतीलच; मात्र जलसंपदा खाते पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे असल्यामुळे त्यांच्याकडे पाठपुरावा होईल. भाजपच्या अजेंड्यावर नवीन धरण हेच प्रथम आहे. -बाळासाहेब सानप, आमदार तथा शहराध्यक्ष, भाजप 
 
 
बातम्या आणखी आहेत...