आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

किकवी प्रकल्प गुंडाळल्यास जआंदोलन छेडणार; भुजबळ यांचा सरकारला इशारा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नाशिक शहरच नव्हे तर मराठवाड्याच्यादृष्टीने महत्त्वपूर्ण ठरलेल्या किकवी पेयजल प्रकल्प सरकारने गुंडाळण्याचा प्रयत्न केला तर राष्ट्रवादी काँग्रेस मोठे जनआंदोलन उभारेल, असा इशारा माजी खासदार समीर भुजबळ यांनी दिला आहे.

नवा भूसंपादन कायदा व गत चार वर्षात पुरेशी तरतूद न झाल्यामुळे त्र्यंबकेश्वरमधील किकवी प्रकल्प अडचणीत अाल्याचे वृत्त 'दिव्य मराठी’ने दिले होते. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनीही जुन्या प्रकल्पांसाठी सुधारित प्रशासकीय मान्यता िदली तरी निधीचा प्रश्न कठीण बाब असल्याचे सांगत ‘किकवी’बाबतही अशीच परिस्थिती असल्याचे अप्रत्यक्षपणे स्पष्ट केले हाेते. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने अाक्रमक पवित्रा घेतला अाहे. भुजबळ यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले अाहे की, गंगापूर धरणातून होणारा पाणीपुरवठा भविष्यात कमी पडणार आहे. ही बाब लक्षात घेत अापण खासदार असताना किकवी पेयजल प्रकल्पाच्या रु.२८३.५४ कोटी प्रस्तावास प्रशासकीय मान्यता मिळवली. एवढेच नव्हे तर, १० गावांतील भूसंपादनाची प्रक्रिया सुरू केली. या प्रकल्पाची निविदा कार्यवाही पूर्ण होऊन कंत्राटदराला इरादा पत्रही दिले अाहे. ‘किकवी’मुळे पिण्याच्या पाण्याबराेबरच गोदावरीची पुरस्थितीसुद्धा नियंत्रणात येईल. मराठवाड्यासाठी पिण्याचे पाणी उपलब्ध हाेऊ शकेल. या वर्षापासून सन २०१८ पर्यंत १२५ ते १५० कोटी रुपये टप्प्याटप्प्याने दिले तर हा प्रकल्प निश्चितच पूर्ण होऊ शकतो.'
पाण्यामुळेच नाशिक बाद
दिल्ली- मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडोरमध्ये इगतपुरी-नाशिक-सिन्नर या औद्योगिक क्षेत्राचा समावेश केला होता. मात्र जलसंपदा विभागाने नाशिकमध्ये पाणी नसल्याचे उद्योग विभागाला कळवल्यामुळे नाशिकला वगळण्यात अाल्याचा अाराेपही भुजबळ यांनी केला.